शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

पैसे न भरता रेल्वे प्रवासाचे तिकीट बूक करणे आता शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 1:11 AM

जास्तीत जास्त प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करावा यासाठी आता तुमच्याकडे पैसे नसले तरीही रेल्वे प्रवासाचे तिकीट बूक करता येणार आहे. यासाठी आयआरसीटीसीने ‘ई-पे लेटर’ (ई-पे लेटर) ही नवीन योजना प्रवाशांसाठी आणली आहे.

ठळक मुद्देसंडे हटके बातमीआयआरसीटीसीची अद्ययावत नवीन ई-पे लेटर योजना प्रवाशांसाठी सुरू१४ दिवसांनी प्रवाशाला भरावे लागणार पैसे

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : जास्तीत जास्त प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करावा यासाठी आता तुमच्याकडे पैसे नसले तरीही रेल्वे प्रवासाचे तिकीट बूक करता येणार आहे. यासाठी आयआरसीटीसीने ‘ई-पे लेटर’ (ई-पे लेटर) ही नवीन योजना प्रवाशांसाठी आणली आहे. यायोजनेत मात्र तिकीट बूक झाल्यानंतर १४ दिवसांनी प्रवाशाला पैसे भरावे लागणार आहेत.असे करा तिकीट बूकआयआरसीटीसीमध्ये नवीन अकाऊंट तयार करा किंवा आधीचे अकाऊंट असेल तर लॉग इन करा. जे तिकीट बूक करायचे आहे त्याविषयी डिटेल्स भरा. तुमच्या सोयीनुसार ट्रेन निवडा आणि नंतर बूूक नाऊवर क्लिक करा. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. त्यात तुम्हाला प्रवासाचा तपशील आणि कॅपचा कोड भरावं लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर पुढच्या बटनावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल. त्यात तुम्ही डेबिट, क्रेडिट, भीम अ‍ॅपचे डिटेल्स भरा. त्यानंतर ई-पे लेटरचे आॅप्शन मिळेल. त्यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ई-पे लेटरवर रजिस्ट्रेशन करा. त्यासाठी तुम्हाला डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.ई-पे लेटर.इन जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर बिल पेमेंटच आॅप्शन येईल. तो सिलेक्ट केल्यावर प्रवासाचे तिकीट मिळेल.ई-पेमेंट योजनाया योजनेसाठी अर्थशास्त्र प्रायव्हेट लिमिटेडचा पायलट प्रोजेक्ट मदत करेल. योजनेत आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर पैसे न भरता आॅनलाईन तिकीट बूक करता येईल. त्याचं पेमेंट १४ दिवसांनंतर करावे लागेल. या सेवेचा फायदा घेणाऱ्या ग्राहकांना पेमेंट करताना ३.५ टक्के चार्ज द्यावा लागेल. १४ दिवसांच्या आत पेमेंट करत असाल, तर जास्त व्याज द्यावं लागणार नाही. तुम्ही वेळेवर पैसे भरलेत तर तुमची क्रेडिट लिमिटही वाढेल.तिकीट बुक झाल्यानंतर १४ दिवसांनंतरही तुम्ही पेमेंट केलं नाहीत, तर तिकिटाच्या किमतीवर व्याज घेतलं जाईल. त्याहून जास्त उशीर केलात तर तुमचं अकाऊंट रद्द होऊ शकतं.ई-पे सेवा या सेवेचा फायदा तुम्ही तुमच्या आयआरसीटीसी अकाऊंटवरून घेऊ शकता. तुम्ही घेतलेल्या तिकिटाची किंमत तुमच्या क्रेडिटमध्ये असायला हवी आणि ठरलेल्या वेळेत पेमेंट व्हायला हवं. तुम्ही पेमेंट करायला उशीर केलात तर तुमचं क्रेडिट कमी होईल. यानंतर तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकणार नाही, अशी ही योजना आहे. मात्र या योजनेत सहभागी होताना तुमच्याजवळ पैसे नसले तरी पुढील प्रवासासाठी तुम्ही आरक्षित तिकीट बूक करू शकणार आहात.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ