शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

बाजारभावापेक्षा निम्म्या दरानेच केळी खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 16:09 IST

शेतकरी सापडले संकटात : सध्याचे जाहीर दर मुळात कमी असताना तोही दर मिळेना

रावेर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केळी बाजारभाव समितीद्वारे निम्म्यावर उतरवलेल्या केळी बाजारभावांनाही हरताळ फासून, त्यापुढे एक पाऊल पुढे टाकत अर्थात त्यापेक्षाही निम्मे भावात केळी खरेदी करण्याचा कित्ता जगावर कोसळलेल्या कोरोनाच्या महामारीच्या संकटातही व्यापारी गिरवत असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. किंबहुना, केळीचे फळ हे नाशवंत असताना सरकारने या नाशवंत फळाला फळाची राजमान्यता देण्यापासून ते केळी बाजार भावांवर नियंत्रण ठेवण्यापर्यंत वाऱ्यावर सोडल्याने केळी उत्पादक शेतकरी अखेर ‘अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो.. ’ म्हणून व्यापाºयाच्या विळ्याखाली शरणागती पत्करत असल्याची शोकांतिका आहे.कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये केळीची वाहतूक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झाल्यानंतर उत्तर भारतात केळीची वाहतूक सुरळीत झाली असली तरी, सतत सात दिवस एक हजार व त्यापेक्षा जास्त भाव असतांना मात्र तालूक्यात ४०० ते ४५० रूपये प्रतिक्विंटल दराने केळी खरेदी केली जात होती. परिणामत : तब्बल सात दिवस एक हजारावर स्थिर राहीलेले केळी बाजारभाव रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती व केळी बाजारभाव समितीने थेट निम्म्यावर आणून घोषित केले. केळी व्यापाऱ्यांकडून मातीमोल भावाने सुरू असलेल्या ३५० ते ४०० प्रतिक्विंटल केळी खरेदीला त्यामुळे टाच बसेल व बाजारभाव नियंत्रित होतील असा जावईशोध रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती व केळी बाजरभाव समितीने लावला.दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार फैजपूर प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी आमदार शिरीष चौधरी व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुक्ताईनगर व रावेर विधानसभा क्षेत्रातील केळी व्यापारी, शेतकरी, केळी उत्पादक महासंघ व वाहतूकदार यांची सावदा येथील शासकीय विश्रामगृहात समन्वय बैठक घेतली. त्यात केळी बाजारभाव समितीद्वारे घोषित होणाºया केळी बाजारभावातच केळी खरेदी करून केळी व्यापारातील सर्व घटकांनी परस्परांशी सहकार्याने समन्वय साधण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला.लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनासह कृषी व पणन तथा सहकार विभाग, व्यापारी, शेतकरी व वाहतूकदार अशा सर्वसमावेशक घटकांनी मंथन करून थेट निम्म्यावर गडगडलेल्या जाहीर भावातच केळी खरेदीसाठी सहमती दर्शवली असली तरी, उगवत्या सुर्याने दिवस उजाडताच केळी व्यापाºयांनी पुढे पाठ व मागे सरसपाट असाच प्रत्यय घडवला आहे. कारण केळी बाजार भावांपेक्षा कधी थेट निम्मे दरात तर कधी प्रतिक्विंटल २०० ते २५० रूपये कमी दराने केळी खरेदी करण्याचा कित्ता व्यापारी कायम गिरवत आहेत.आजही तालूक्यात नवती ६०० /१० रू व कांदेबाग तथा पीलबाग - ५००/१० रू व वापसी २०० रू प्रतिक्विंटल असे दर केळी बाजारभाव समितीद्वारे घोषित झाले असतांना काही ठिकाणी चक्क ३०० ते ३५० रू, काही ठिकाणी ४०० ते ४५० रू प्रतिक्विंटल भावाने केळी खरेदी करण्यात आल्याची शोकांतिका आहे.शेतकºयांमध्ये पसरला असंतोषबाजार समितीने केळीभाव निम्म्यावर उतरवले असतांना व राष्ट्रीय आपत्तीत जिल्हा प्रशासनाने गाभिर्याने दखल घेऊनही व्यापाºयांनी त्यापेक्षाही केळीची कमी दरात खरेदी करण्याची मानसिकता ठेवली असेल तर, जगाच्या या पोशिंद्याला राष्ट्रीय आपत्तीत अडवणूक करून मानवतेला काळीमा फासण्याचा अन्य कोणताही दुर्दैवी व अक्षम्य प्रकार असू शकत नाही असा कमालीचा असंतोष केळी उत्पादक शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.केळी व्यापार कायद्याच्या चौकटी बसवावानाशवंत केळीचे विपणन हा विषय म्हणजे अतिसंवेदनशील व अवघड जागेवरील दुखणे मानले जात असल्याने व राज्याच्या पणन व सहकार तथा विक्रीकर, व्यवसायकर आणि आयकर विभागाने तत्संबंधी कोणतेही नियंत्रण सुरूवातीपासून न राखल्याने व्यापाºयांनी त्यावर आपली हुकूमत सिध्द केली आहे. तत्संबंधी जागतिक महामारीतील राष्ट्रीय आपत्तीत जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांना केराची टोपली दाखवणाºया या जबाबदार घटकाला मात्र कायद्याच्या चौकटीत बसवण्याची गरज असल्याचा सूर व्यक्त होत आहे.