जळगाव शहरात अचानक थांबलेल्या कारवर धडकली बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 17:00 IST2018-05-09T17:00:56+5:302018-05-09T17:00:56+5:30
महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. मंगळवारी विद्युत कॉलनीजवळ कार, रिक्षा व दुचाकीचा विचित्र अपघात होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी दुपारी एक वाजता महामार्गावर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ एस.टी.बस, कार व दुचाकी यांच्यात विचित्र अपघात झाला. यात कोणीही जखमी झाले नाही.

जळगाव शहरात अचानक थांबलेल्या कारवर धडकली बस
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,९ : महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. मंगळवारी विद्युत कॉलनीजवळ कार, रिक्षा व दुचाकीचा विचित्र अपघात होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी दुपारी एक वाजता महामार्गावर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ एस.टी.बस, कार व दुचाकी यांच्यात विचित्र अपघात झाला. यात कोणीही जखमी झाले नाही.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर येथील दीपक विक्रम पाटील (वय २५) हा तरुण कार (क्र.एम.एच.१९ ए.एक्स.४०२५) घेऊन एमआयडीसीत जात होता. त्यावेळी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर त्याने कारची गती अचानक कमी केली. त्यामुळे मागून आलेली मुक्ताईनगर आगाराची जळगाव-मुक्ताईनगर ही एस.टी.बस (क्र.एम.एच.०६ एस.८३३१) कारवर धडकली. त्यात कार पुढे जावून पुढे चालणाºया दुचाकीवर धडकली. या दुचाकीवर असलेल्या राजश्री सोनवणे या दुचाकीच्या खाली फेकल्या गेल्या. या अपघातातील तिन्ही वाहने एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आली होती.