ब्रेक फेल झाल्याने भाविकांची बस कारवर आदळली, गोद्री कुंभस्थळाजवळील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2023 16:30 IST2023-01-26T16:29:23+5:302023-01-26T16:30:13+5:30
हा अपघात गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास फत्तेपुरजवळ घडला. सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.

ब्रेक फेल झाल्याने भाविकांची बस कारवर आदळली, गोद्री कुंभस्थळाजवळील घटना
- मोहन सारस्वत
जामनेर (जि.जळगाव) : गोद्री (ता.जामनेर) येथे सुरु असलेल्या हिंदु गोरबंजारा,लबाना, नायकडा समाज कुंभमेळ्यासाठी आंध्रप्रदेशातून आलेल्या खासगी बसचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे बसने कारला धडक दिली. सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.
हा अपघात गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास फत्तेपुरजवळ घडला. सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. बस जामनेर येथून फत्तेपुरकडे जात होती. बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस कारवर आदळली. कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले.