मुक्ताईनगरला बसचालकाचा हृदयविकाराने मृत्यू; नोकरीवरून कमी करण्याची होती भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 22:31 IST2021-12-17T22:30:53+5:302021-12-17T22:31:03+5:30
नोकरीवरून कमी करतील, अशी भीती त्यांच्या मनात होती.

मुक्ताईनगरला बसचालकाचा हृदयविकाराने मृत्यू; नोकरीवरून कमी करण्याची होती भीती
जळगाव : एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघत नसल्याने अनेक कर्मचारी दडपणात आहेत. कारवाईची भीती व ताण-तणावामुळे मुक्ताईनगर आगारातील बसचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी त्याच्या घरी घडली.
जितेंद्र गोपाळ नाथजोगी (४५, रा. जोगीवाडा, मुक्ताईनगर) असे या बसचालकाचे नाव आहे. नोकरीवरून कमी करतील, अशी भीती त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. या ताण-तणावातून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या परिवारातील सदस्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ते जगदीश नाथजोगी यांचे भाऊ होत. घटनेची माहिती मिळताच परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने अंत्यविधीसाठी पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली.