निवडणूक साहित्य घेण्यासाठी जाणारी बस भर रस्त्यात पडली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 12:05 IST2019-10-20T12:05:09+5:302019-10-20T12:05:38+5:30

वाहतुकीचा खोळंबा

A bus closed down on the road | निवडणूक साहित्य घेण्यासाठी जाणारी बस भर रस्त्यात पडली बंद

निवडणूक साहित्य घेण्यासाठी जाणारी बस भर रस्त्यात पडली बंद

जळगाव : विधानसभा निवडणुकीचे साहित्य व कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी जाणारी बस भर रस्त्यात बंद पडल्याने बराच वेळ खोळंबा झाला. तसेच यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली होती.
२१ रोजी होणाºया मतदानासाठी २० रोजी सकाळी मतदान साहित्य वाटप करण्यात आले. हे साहित्य व कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामाकडे बस जात असताना ती जळगाव-औरंगाबाद मार्गावर बंद पडली. यामुळे या मार्गावरील वाहतूक बराच विस्कळीत झाली.

Web Title: A bus closed down on the road

टॅग्स :Jalgaonजळगाव