बेलफाट्याजवळ बसचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 21:38 IST2019-09-05T21:38:00+5:302019-09-05T21:38:05+5:30
डंपरने मारला कट : मोठा अपघात टळला, डंपरचालक डंपरसह झाला पसार

बेलफाट्याजवळ बसचा अपघात
तळेगाव, ता. जामनेर : येथुन जवळच असलेल्या जामनेर - शहापुर रस्त्यावरील बेलफाट्याजवळ जामनेरकडुन सावळदबारा कडे जाणाऱ्या डंपरने कट मारल्याने बस कलंडली. सुदैवाने यावेळी प्रवाशांना इजा झाली नाही.
यावेळी बस चालक वासुदेव बुंदे याने प्रसंगावधन राखत बस रस्त्याच्या खाली उतरवली. यामुळे मोठा अपघात टळून मधील पंचवीस ते तीस प्रवासी व विद्यार्थी यांना इजा झाली नाही. समोरुन येणाºयाने डंपर ने कट मारला असता रस्त्याच्या दोन्ही बाजुने काम सुरु असल्याने बस मोठ्या शिताफीने खाली उतरवली. मुरमामुळे बस उलटताना वाचली.
याबाबत चालक वासुदेव बुधे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्सटेबल काकङे, निलेश घुगे आदी करीत आहे. घटनास्थळी डेपो मॅनेजर धनराळे यांनी भेट दिली
अन प्रवासी घाबरले
डंपरने कट मारल्यावर बस रस्त्याच्या खाली उतरल्यावर ती उलटण्याच्या बेतात असल्याने बस मधील सर्वच प्रवासी घाबरुन गेले. थोडावेळ तर चांगलाच गोंगाट निर्माण झाला. मात्र बस उलटली नसून आपण सुरक्षित असल्याचे लक्षात येताच बसमधील प्रवासी हे संकटकालीन दरवाजासह खिडकीतूनही बसच्या बाहेर आले.