आशिया महामार्गावर बर्निंग ट्रक....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 17:10 IST2017-10-17T17:07:31+5:302017-10-17T17:10:32+5:30

हरताळे फाट्यावरील घटनेत चालक व वाहकाने प्रसंगावधान राखल्याने टळली जिवीतहाणी

Burning truck on Asia highway ....! | आशिया महामार्गावर बर्निंग ट्रक....!

आशिया महामार्गावर बर्निंग ट्रक....!

ठळक मुद्देमालट्रक पूर्णपणे जळून खाक झालामालट्रकचे पुढचे पाटे तुटल्याने डिझेलच्या टाकीला लागली आगचालक व क्लिनर यांनी प्रसंगावधान राखत पेटलेले वाहन लावले रस्त्याच्या कडेला

आॅनलाईन लोकमत
मुक्ताईनगर, दि.१७ : नागपूरकडे बटाटे घेऊन जाणा-या मालट्रकचे पुढचे पाटे तुटल्याने डिझेलच्या टाकीला आग लागून मालट्रक ने पेट घेतल्याची घटना मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. मात्र सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही.
आशिया महामार्ग क्रमांक ४६ वरील हरताळेवाफाट्या लागत हॉटेल फ्लोरा जवळ ही घटना घडली. यामुळे महामार्गावरील दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातात मालट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. सुदैवाने चालक व क्लिनर यांनी प्रसंगावधान राखून पेटलेले वाहन रस्त्याच्याकडेला लावून वाहनातून उडी टाकली. त्यामुळे जिवितहानी टळली. पहाटेच्या सुमारास पेटलेल्या ट्रक मधील आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत होते. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. आगीमुळे ट्रकमधील बटाटे जळाले.





 

Web Title: Burning truck on Asia highway ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.