शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात महामार्गावर ‘द बर्निंग कार’चा थरार, चौघांचा जीव वाचला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 18:28 IST

Burning Car : शॉर्ट सर्कीटमुळे घेतला पेट

ठळक मुद्देरस्त्याच्या मध्यभागीच ही घटना घडल्याने महामार्गावर वाहतुकीचा ख‌ोळंबा झाला होता. काही कळण्याच्या आत कारमधून भडका उडाला. यानंतर चौघेही मित्र महामार्गालगत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडे पळत सुटले.

जळगाव : सिग्नलवर थांबलेल्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता महामार्गावर आकाशवाणी चौकात घडली. कारमधून निघणाऱ्या आगीच्या ज्वालांमुळे प्रचंड पळापळ व धावपळ उडाली. नशीब बलवत्तर म्हणून कारमधील चौघे जण बचावले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. वाहतूक पोलीस, नागरीक व अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांनी कार विझविण्यात आली. रस्त्याच्या मध्यभागीच ही घटना घडल्याने महामार्गावर वाहतुकीचा ख‌ोळंबा झाला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कासोदा येथील आशिष मिलिंद तायडे (वय २२) हा  मित्र दिपक अडकमोल, पवन अडकमोल व गोपाल राक्षे यांच्यासोबत कारने (क्र.जी.जे.०५  सी.एच.९४४९) बुधवारी सकाळी जळगावात आला होता. अजिंठा चौफुली येथून काम आटोपून दुपारी २ वाजेच्या सुमारास ते पुन्हा कासोदा येथे घराकडे जाण्यासाठी निघाले. अडीच वाजता ते अजिंठा चौफुली येथे पोहचले. सिग्नल नसल्याने त्यांनी कार थांबविली. यावेळी कारमधून धुर निघत असल्याचे अशिषसह  मित्रांच्या लक्षात आले. नेमका काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी चौघेही कारमधून बाहेर उतरले. पाहणी केली असता, कारच्या खाली शॉर्टसर्किटने झाल्याचे दिसून आले. काही कळण्याच्या आत कारमधून भडका उडाला. यानंतर चौघेही मित्र महामार्गालगत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडे पळत सुटले.

अग्निचा भडका अन‌् पळापळकारमधून अग्निचा भडका उडाल्यानंतर चौकात थांबलेल्या वाहतूक पोलिसांनी तत्काळ महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविला. त्यानुसार गोलाणी मार्केट येथून अवघ्या काही मिनिटातच अग्निशमन बंब घटनास्थळावर पोहचला. अग्निशमन विभागाचे युसुफ पटेल, देवीदास सुरवाडे, प्रकाश चव्हाण, गंगारधर कोळी, राजेंद्र चौधरी, सोपान जाधव या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले. रस्त्याच्या मधोमध कार जळाल्याने तसेच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने रस्त्यावर काही काळासाठी वाहतूक खोळंबली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शहर वाहतूक शाखेचे साहेबराव कोळी, किरण मराठे, गणेश पाटील, बारसू नारखेडे, फिरोज तडवी, मोहनीन पठाण या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने खाक झालेली कार रस्त्याच्या बाजूला केली व वाहतूक सुरळीत केली. अग्निशमन विभागाचे प्रकाश चव्हाण यांनी घटनेची नोंद केली आहे.

 

टॅग्स :fireआगtraffic policeवाहतूक पोलीसJalgaonजळगावcarकार