अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरूणीचा मृतदेह सापडल्याने चाळीसगावमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 11:09 IST2018-03-03T11:09:13+5:302018-03-03T11:09:13+5:30

घटनास्थळी राखाडी रंगाची ओढणी मिळाली आहे.

Burned body of girl found in Jalgaon | अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरूणीचा मृतदेह सापडल्याने चाळीसगावमध्ये खळबळ

अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरूणीचा मृतदेह सापडल्याने चाळीसगावमध्ये खळबळ

जळगाव: चाळीसगाव - नांदगाव रस्त्यालगत खडकी शिवारात एका अज्ञात १८ ते २० वर्षाच्या  तरुणीचा जळालेल्या अवस्थेत फक्त सापळा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार शनिवारी पहाटे उघडकीस आला. घटनास्थळी राखाडी रंगाची ओढणी मिळाली आली आहे. तरुणीला जाळून मारल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, खडकी शिवारात समाधान धर्मा कोळी यांच्या शेतात आरोपींनी शुक्रवारी रात्री १० नंतर तरुणीला पेटवून दिले असावे. घटनास्थळी पोलिस उपविभागीय आधिकारी अरविंद पाटील, पोनि रामेश्वर गाढे पाटील, उपनिरीक्षक घोळवे, शशिकांत पाटील यांनी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह पूर्णपणे जळाल्याने ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान मृतदेह तरुणीचा की महिलेचा याचाही शोध घेण्यात येत आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला बोलावण्यात येणार आहे.
 

Web Title: Burned body of girl found in Jalgaon