भुसावळात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 15:35 IST2018-10-02T15:32:50+5:302018-10-02T15:35:50+5:30
राष्ट्रीय मजदूर सेनेतर्फे सोमवारी दुपारी बारा वाजता म्युुनिसिपल हायस्कूलपासून ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

भुसावळात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी मोर्चा
भुसावळ : आकाशाला भिडणारी महागाई, पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीमुळे जनता होरपळून निघत आहे. देशात आणीबाणी सदृश परिस्थिती दिसत आहे. सरकार गोरगरीब शेतकरी, शेतमजूर कष्टकरी कामगार, मोलकरीण सर्वसामान्य जनतेवर विविध कर लावून पिळवणूक करते. सर्वसामान्य जनता हवालदिल झालेली असून शेतीमालाला भाव मिळावा या मागण्यांसाठी राष्ट्रीय मजदूर सेनेतर्फे सोमवारी दुपारी बारा वाजता म्युुनिसिपल हायस्कूलपासून ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हा प्रमुख राजू डोंगरदिवे यांनी केले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी अजगर शेख, सुभाष सपकाळे, नजीर शेख, आकाश विरघट, राजू चौथमल, कल्पना तायडे, सोनू विरघट, हमीदा खान, रंजना शिरतूरे, जमिला गवळी आदींनी परिश्रम घेतले.