विजेच्या धक्क्याने दगावला बैल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:41+5:302021-07-14T04:19:41+5:30
नांदेड , ता. धरणगाव : विजेच्या डीपीजवळ शेतात वखरणी करीत असताना जमिनीत उतरलेल्या वीज प्रवाहामुळे पन्नास हजार रुपये ...

विजेच्या धक्क्याने दगावला बैल
नांदेड , ता. धरणगाव : विजेच्या डीपीजवळ शेतात वखरणी करीत असताना जमिनीत उतरलेल्या वीज प्रवाहामुळे पन्नास हजार रुपये किमतीचा बैल जागीच दगावला. ही घटना नांदेड शेतशिवारात १३ रोजी सकाळी घडली. येथील शेतकरी ज्ञानदेव चिंधू वाणी यांनी नांदेड शिवारातील ममता संजय पाटील यांचे शेत निम्मे बटाईने कसण्यासाठी केले आहे. त्या शेतात ६३ केव्ही क्षमतेची विद्युत डिपी आहे. १३ रोजी सकाळी वाणी यांचा सालदार रमा गायठ्या बारेला हा डिपीजवळ वखरणी करत असताना डिपीपासून अंदाजे पाच ते सात फूट अंतरावर जमिनीत वीजप्रवाह उतरलेला होता, त्यामुळे बैल एकदम डिपीकडे ओढला जावून जागीच गतप्राण झाला. घटनास्थळी सकाळी वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला तर दुपारी पशुधन विकास अधिकारी डॉ . प्रमोद सोनोने, पशुधन पर्यवेक्षक डॉ. सतीश वैष्णव यांनी शवविच्छेदन केले. हे. काँ. प्रदीप पवार, अंकुश बाविस्कर यांनी पंचनामा केला. त्यांना ग्रामस्थ प्रवीण पाटील, नीलेश अत्तरदे, महेश वाणी, नितीन जंगले, निवृत्ती चौधरी यांनी सहकार्य केले. वीज कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी ज्ञानदेव वाणी यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
फोटो : १४ एचएसके ०५
(वीज प्रवाहाने दगावलेला बैल. छाया : राजेंद्र रडे)