विजेचा शॉक लागून बैलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:31 IST2019-06-25T18:29:52+5:302019-06-25T18:31:41+5:30
सामनेर येथील घटना

विजेचा शॉक लागून बैलाचा मृत्यू
सामनेर, ता. पाचोरा : येथील शेतकरी बाळकृष्ण पाटील यांचे शेतात पेरणीचे औताच्या बैलाला विजेचा शॉक लागून या बैलाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे या शेतकऱ्याचे ४० हजाराचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या शेतकºयाने केली आहे.