शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
5
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
6
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
7
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
8
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
9
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
10
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
11
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
12
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
13
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
14
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
15
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
16
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
19
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात भरधाव डंपरच्या धडकेत बुलढाण्याचे दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 21:59 IST

चालकास अटक

भुसावळ  : लग्नासाठी भुसावळात आलेल्या बुलढाण्यातील दाम्पत्याच्या दुचाकीला डंपरने कट मारल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला . ही घटना शुक्रवार रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास खडका चौफुलीवर घडली. यासंदर्भात बाजारपेठ पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास अटक करण्यात आली आहे.
या दुर्घटनेबाबत माहिती अशी की,  चंद्रकांत जगन्नाथ वराडे  (६३ ), संध्या चंद्रकांत वराडे( ५६ ) दोन्ही रा. चिखली रोड , बुलढाणा हे भुसावळ येथील गडकरी नगरात नातेवाईकांकडे लग्नसमारंभासाठी आले होते. गुरुवार रोजी त्यांनी देना नगरातील नातेवाइकांकडे मुक्काम केला. त्यानंतर सकाळी वराडे हे मोटरसायकलवर (एम. एच. २८ - ६६७१)  या मोटरसायकलने खडकारोडने गडकरी नगरकडे जाण्यासाठी निघाले होते. खडका चौफुली जवळ येताच डंपरचा  ( एम . एच. १९ झेड - ३१९२) त्यांच्या मोटर सायकलला कट लागला . त्यामुळे दुचाकी एकदम घसरली. या अपघातात पती व पत्नी हे डंपरच्या मागील चाकाखाली आल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे , पोलीस निरीक्षक दिलीप भागवत ,  सचिन पोळ ,, संजय भदाणे,  कृष्णा देशमुख , रमण सुरडकर , भालेराव यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

यासंदर्भात बाजारपेठ पोलिस ठाण्यात णे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   डंपर चालक महेंद्र ब्रिजलाल कोळी रा. भोरटेक ता. यावल यास अटक करण्यात आली आहे.