शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
4
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
5
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
6
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
7
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
8
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
9
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
10
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम
11
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
12
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
13
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
14
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
15
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
16
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
17
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
18
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
19
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
20
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."

कोरोना रुग्णाच्या मृतदेहासाठी प्लास्टिक व पांढरे कापड आणा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 23:34 IST

कोरोना रुग्ण दगावल्यानंतर नातेवाईकांना प्रेताला गुंडाळण्यासाठी प्लास्टिक व पांढरा कागद आणण्याची सूचना ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांनी केली.

ठळक मुद्देआरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली नातेवाईकांना सूचना : एरंडोल कोविड सेंटरमधील संतापजनक प्रकार.

लोकमत न्यूज नेटवर्क

एरंडोल : ग्रामीण रुग्णालयात असलेल्या  कोविड केअर सेंटर मध्ये एरंडोल येथील अरुण भिका महाजन ( ५५)  या कोरोना रुग्णाचे उपचारादरम्यान रविवारी पहाटे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना प्रेताला गुंडाळण्यासाठी प्लास्टिक व पांढरा कागद आणण्याची सूचना ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांनी केली. एवढेच नव्हे तर नातेवाईकांनाच प्लास्टिक व कापड गुंडाळण्याची सूचनासुद्धा करण्यात आली. या धक्कादायक प्रकारामुळे मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

यासंबंधीचा व्हीडीओ समाज माध्यमातही व्हायरल झाला आहे.  एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये अरुण महाजन यांना शनिवारी चार वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आले. त्यांचे  पहाटे कोरोना शमुळे निधन झाले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना बोलविण्यात आले. मृतदेहाला गुंडाळण्यासाठी प्लास्टिक पेपर व पांढरा कापड आणण्याचे सांगण्यात आले. यावेळी उमेश महाजन, अमोल महाजन, राजेश महाजन, या नातेवाईकांनी प्लास्टिक पेपर व पांढरा कापड आल्यावर प्रेताला गुंडाळण्याची पुन्हा सूचना करण्यात आली त्यामुळे र नातेवाईकांनी प्रेताला प्लास्टिक पेपर व पांढरा कापड गुंडाळला. कोविड केअर सेंटरच्या बाहेर ठीक ठिकाणी वापरलेले हॅन्ड ग्लोज , पीपीइ किटस, कोरोना रुग्णांना वापरलेली औषधे व अन्य साहित्य उघड्यावर पडलेले नातेवाईकांना दिसले. त्यामुळे एकच संताप व्यक्त करण्यात आला.

यावेळी कोणीही जबाबदार डॉक्टर्स कोविड केअर सेंटर मध्ये हजर नव्हते. अशी तक्रार महात्मा फुले युवा मंच चे प्रदेशाध्यक्ष उमेश महाजन यांनी  केली. दरम्यान रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक असा हा प्रकार असल्याचा आरोप उमेश महाजन यांनी केला आहे.

अरुण महाजन यांच्या नातेवाईकांनी दिलेला व्हिडिओ एकतर्फी असून त्यात एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचा वार्ड बॉयसह कोणीही कर्मचारी कुठेही दिसत नाही.  रुग्णालयात दोन डॉक्टर्स असून येथील कोविड सेंटरमध्ये ४० कोरोना रुग्ण दाखल आहेत व ऑक्सिजन वाडॉमध्ये २४ रुग्ण उपचार घेत आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांच्याशी या नातेवाईकांशी बाचाबाची झाल्यामुळे त्यांनी  खोटी तक्रार केलेली आहे.-विनय गोसावी, प्रांताधिकारी, एरंडोल. 

टॅग्स :JalgaonजळगावErandolएरंडोलcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू