उज्ज्वल स्प्राउटर इंटरनॅशनल स्कूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:37 IST2021-09-02T04:37:02+5:302021-09-02T04:37:02+5:30
उज्ज्वल स्प्राउटर इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित गोकुळाष्टमीचा विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी आनंद लुटला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोपाळकाला बनविण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. नंतर ...

उज्ज्वल स्प्राउटर इंटरनॅशनल स्कूल
उज्ज्वल स्प्राउटर इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित गोकुळाष्टमीचा विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी आनंद लुटला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोपाळकाला बनविण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. नंतर गोपाळकाल्याचे काय महत्त्व शिक्षिका काजल तेजवानी यांनी विद्यार्थ्यांनी पटवून दिले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभागी होऊन त्यांच्या घरी गोपाळकाला बनविला. त्यानंतर सर्व शिक्षकांनी एक-एक करून त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून सजवलेली दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये शाळेच्या वरिष्ठ लिपिक किरण जाधव यांनी अचूकपणे दहीहंडी फोडली. उपक्रमासाठी शाळेच्या अध्यक्षा अनघा गगडाणी व मुख्याध्यापिका मानसी गगधानी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
००००००००
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे दहीहडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी कृष्णासारखी वेषभूषा परिधान केली होती, तर मुलींनी राधेची वेशभूषा परिधान केली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे अध्यक्ष नरेश पी. चौधरी यांचा हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य महेश कवडे, समन्वयक जी. डी. पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
०००००००
किलबिल बालक मंदिर
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त गोपाळकाला या कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रात्यक्षिक घेण्यात आले. सर्व सिनियर बालवाडीच्या पालकांसह चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. मुलांनी ऑनलाइन प्रात्यक्षिक केले. या कार्यक्रमाला शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारे, मुख्याध्यापिका मंजूषा चौधरी तसेच शिक्षिका रत्नप्रभा नेमाडे व कुंदा भारंबे आदी उपस्थित होत्या.
०००००००
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राथमिक विभागात गोकुळ अष्टमी अतिशय भक्तिभावाने व जल्लोषात साजरी झाली. श्रीकृष्ण जन्म ते दहीहंडी हा कृष्णजन्म सोहळा अल्पावधीतही अतिशय सुंदर पद्धतीने सादर केला. सर्वप्रथम श्रीकृष्णाचा जन्म पाळणा गायला. त्यानंतर प्राथमिक विभागाच्या समन्वयिका डॉ. रत्नमाला पाटील यांच्या हस्ते पाळण्याचे पूजन व अरे माझ्या गोपाळ कृष्णा तुला ओवाळेन आरती, ही आरती गाऊन भगवान श्रीकृष्णाचे आनंदाने स्वागत झाले. त्यानंतर बरोबर गोविंदरे रे गोपाळाच्या ठेक्यावर ताल धरत लेझीम खेळत विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, जयश्री पाटील, लीना जोशी, नकुल सोनवणे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन स्मिता भामरे यांनी केले़
०००००००
विवेकानंद माध्यमिक विभाग
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमिक विभागामध्ये प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील आणि समन्वयक गणेश लोखंडे यांच्या मार्गदर्शनात गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली़ कविता सूर्यवंशी यांनी सणाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर अनुराधा धायबर यांनी श्रीकृष्णाची पिशाच्चावर विजय ही कथा सांगून आयुष्यामध्ये कुठल्याही वाईट शक्ती आणि वाईट सवयींवर कशाप्रकारे विजय मिळवता येईल, याबद्दल प्रबोधन केले. या उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ माखन चोर कृष्ण कन्हैया हा विषय विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. या स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक दत्तात्रय गंधे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन पाटील यांनी केले.