लाचखोर हवालदाराला ११ पर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 21:18 IST2020-10-09T21:18:31+5:302020-10-09T21:18:43+5:30
जळगाव : तक्रारदाराविरूध्द आलेल्या अर्जावरून गुन्हा दाखल न करण्याच्या मोबादल्यात पाच हजारांची लाच घेणा-या सतीश रमेश पाटील (रा.पिंप्राळा) याला ...

लाचखोर हवालदाराला ११ पर्यंत पोलीस कोठडी
जळगाव : तक्रारदाराविरूध्द आलेल्या अर्जावरून गुन्हा दाखल न करण्याच्या मोबादल्यात पाच हजारांची लाच घेणा-या सतीश रमेश पाटील (रा.पिंप्राळा) याला ११ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नशिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला हवालदार सतीश पाटील याला लाच घेताना गुरूवारी रंगेहाथ पकडले होते. शुक्रवारी लाचखोर हवालदाराला न्यायाधीश आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती ११ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे ॲड. केतन ढाके यांनी कामकाज पाहिले.