शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कोळश्याच्या कंपनीत बॉयलरचा स्फोट; कामगार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:30 PM

पिंप्री येथील घटना : २५ फूट उंचावर उडाला दीड टनाचा बॉयलरचा दरवाजा

जळगाव : पिंप्री (ता. धरणगाव) येथील प्राईम एनर्जी या कोळसा बनविण्याच्या कंपनीत रविवारी सकाळी ६ वाजता एका बॉयलरमध्ये अचानक गॅस भरला गेल्याने त्या बॉयलरचा स्फोट झाला़ या स्फोटात कंपनीतील कामगार नरोत्तम मारोती भोयार (४६, रा़ पिंप्री, ता़ धरणगाव) हा ठार झाला.या कंपनीत नरोत्तम भोयार हे आॅपरेटर म्हणून कामाला होते़ कंपनीत कोळसा बनविण्याचे काम केले जाते. नरोत्तम हा रात्र पाळीला कामाला होता. दरम्यान, कोळसा बनविताना कंपनीतील बॉयलरमध्ये गॅस निर्माण होतो़ तो गॅस एका वॉलद्वारे काढला जातो. मात्र, रविवारी सकाळी ६ वाजता व्हॉल बंद असल्यामुळे बॉयलरमध्ये गॅस मोठ्या प्रमाणात साठला गेला़ काही वेळातच अचानकपणे मोठा स्फोट झाला. या स्फोटात बॉयलरचा दीड टनाचा दरवाजा २५ फुटापर्यंत उडाला़ हा दरवाजा नरोत्तम यांचा डोक्याला लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच हेल्पर किसन मोरे यांनी तातडीने याची माहिती कंपनीचे मालक मुंबईस्थित नेम विरचंद सोनी यांना दिली.सहा महिन्यांपूर्वीच लागला कामालामयत कामगार नरोत्तम भोयर हा गेल्या सहा महिन्यापासून कामाला लागला होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव