कळमडू, ता. चाळीसगाव, जि.जळगाव : कुंझर येथून ८ रोजी रात्री आठ वाजता बेपत्ता झालेला जयश श्रावण चौधरी (वय १२ वर्षे) या मुलाचा मृतदेह गावापासून जवळच असलेल्या शिरुड रस्त्यावरील शेतातील विहिरीत मृतावस्थेत तरंगताना आढळला. तब्बल ४८ तासांनी त्याचा शोध लागला.अतिशय मनमिळावू, सर्व विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारा जयेश चौधरी हा कुंझर येथील सर्वोदय माध्यामिक विद्यालयात इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होता. ८ रोजी संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटल्यावर शिकवणीसाठी गेला. तेथून घरी आल्यानंतर आई स्वयपांक करत होती व वडील घरात बसले होते. वडिलांनी त्याला केस कापून ये, असे सांगितले व वडील श्रावण चौधरी हे गावात शेती विषयावरील मार्गदर्शनपर बैठकीस गेले होते. तेथे गेले ते घरी आल्यानंतर जेवणाला जयेशला पाहण्यासाठी गेले. मात्र तो न सापडल्याने त्याची सर्वदूर शोधाशोध सुरू झाली. मात्र त्याचा कुठेच शोध न लागल्याने मेहुणबारा पोलिसात जयेशचे वडील श्रावण दगडू चौधरी यांनी तक्रार दिल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस उपनिरीक्षक हेमंत शिंदे व त्याच्या पथकाने कुंझर परीसरातिल जंगलात गावात पूर्ण शोध घेतला. मात्र जयेशचा कुठेही शोध लागला नाह.१० रोजी सकाळी किशोर अशोक गोसावी हे त्याच्या शिरूड रस्त्यावरील शेतात कामाला गेले असता त्याच्या विहिरीत जयेशचा मृतदेह तरंगताना दिसल्याने ही वार्ता गावात पसरताच शोकाकाळ पसरली.किशोर गोसावी यांनी पोलिसात खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. एपीआय सचिन बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हेमंत शिंदे तपास करीत आहेत१२ जानेवारीला देणार होता ‘नवोदय’ची परीक्षाजयेश चौधरी हा शाळेतील अतिशय हुशार व मनमिळावू, शांत स्वभावाचा विद्यार्थी होती. त्याने नवोदय परीक्षेचा फॉर्मही भरला होता व ती परीक्षा तो १२ जानेवारीला देणार होता. त्या आधीच दुदैेवी घटना घडल्याने सर्वत्र शोकाकाळ पसरली आहे.
कुंझर येथील बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला ४८ तासांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 19:57 IST
कुंझर येथून ८ रोजी रात्री आठ वाजता बेपत्ता झालेला जयश श्रावण चौधरी (वय १२ वर्षे) या मुलाचा मृतदेह गावापासून जवळच असलेल्या शिरुड रस्त्यावरील शेतातील विहिरीत मृतावस्थेत तरंगताना आढळला.
कुंझर येथील बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला ४८ तासांनी
ठळक मुद्देमृतदेह विहिरीत सापडला तरंगत्या अवस्थेत१२ जानेवारीला जयेश देणार होता ‘नवोदय’ची परीक्षा