जळगाव रेल्वे स्थानकावर आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 11:57 IST2019-08-03T11:52:56+5:302019-08-03T11:57:54+5:30

रेल्वे स्टेशनवर आरएमएस कार्यालयाच्यासमोर रेल्वे रुळावर ४५ वर्षीय प्रौढाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या उजव्या हातावर अनिल पाटील लोहरे असे गोंधलेले आहे. ही व्यक्ती पाचोरा तालुक्यातील लोहारा किंवा लोहरी येथील असण्याची शक्यता लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केली आहे.

The body found at Jalgaon Railway Station | जळगाव रेल्वे स्थानकावर आढळला मृतदेह

जळगाव रेल्वे स्थानकावर आढळला मृतदेह

ठळक मुद्दे आत्महत्या की अपघात अस्पष्टहातावर गोंदले आहे अनिल पाटील ओळख पटविण्याचे आवाहन

जळगाव : रेल्वे स्टेशनवर आरएमएस कार्यालयाच्यासमोर रेल्वे रुळावर ४५ वर्षीय प्रौढाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या उजव्या हातावर अनिल पाटील लोहरे असे गोंधलेले आहे. ही व्यक्ती पाचोरा तालुक्यातील लोहारा किंवा लोहरी येथील असण्याची शक्यता लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केली आहे. पी.एफ.७-८ च्या दरम्यान हा मृतदेह मध्यरात्री आढळून आला आहे. रेल्वेतून पडून मृत्यू झाला की आत्महत्या हे स्पष्ट झालेले नाही, त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात यांनी केले आहे.

Web Title: The body found at Jalgaon Railway Station