मुक्ताईनगरात रक्तदानासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:35+5:302021-07-14T04:19:35+5:30
मुक्ताईनगर : लोकमत रक्ताचं नातं महायज्ञात सोमवारी मुक्ताईनगरात दुसऱ्यांदा रक्तदान शिबिर झाले. या वेळी २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले ...

मुक्ताईनगरात रक्तदानासाठी
मुक्ताईनगर : लोकमत रक्ताचं नातं महायज्ञात सोमवारी मुक्ताईनगरात दुसऱ्यांदा रक्तदान शिबिर झाले. या वेळी २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले विशेष
म्हणजे महिला रक्तदात्यांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
लोकमत व पचपांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे पाचपांडे हॉस्पिटल येथे हे शिबिर झाले. शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रवीण पचपांडे, डॉ तुषार पचपांडे, डॉ. नितीन भारंबे, डॉ. सह्याद्री किनगे, अतुल बोदडे यांच्याहस्ते झाले. प्रसंगी पंकज कपले, पंकज तायडे, अतिक खान अक्षय काठोके,सतीश गायकवाड रिजवान
चौधरी, अक्षय पालवे आदी उपस्थित होते.
शिबिरात २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात ५ महिलांचा समावेश होता. आठवड्याभरात दुसऱ्यांदा लोकमत रक्ताचं नातं महायज्ञात मुक्ताईनगरातील रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. मुक्ताईनगर सिविल सोसायटी आणि श्रीराम सेना पदाधिकारी युवकांनी शिबिरास सहकार्य केले.
नगरदेवळा येथे
रक्तदानास प्रतिसाद
नगरदेवळा ता.पाचोरा : ‘लोकमत रक्ताच नातं’ या अभियानात नगरदेवळा येथे २६ तरुण़ांनी रक्तदान करीत सामाजिक कार्यात हातभार लावला.
सरदार एस.के.पवार कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचा शुभारंभ सरपंच प्रतीक्षा काटकर यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामशिक्षण समितीचे सचिव शिवनारायण जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्राचार्य व्ही.बी.बोरसे, अविनाश कुडे, डॉ. महाजन, प्रा.उमेश काटकर, विलास भामरे (उपसरपंच), ग्रा.पं.सदस्य राजे़द्र पवार, राजेंद्र महाजन, विनोद परदेशी, राकेश थेपडे,अशोक सोन्नी, अनिल चव्हाण, संदीप राजपूत, सचिन इंगळे, पत्रकार संघाचे मिलिंद दुसाने, प्रकाश जगताप, संजय सोनार,शैल़ेद्र बिरारी, दीपक परदेशी, सौरव तोष्णीवाल,जितेंद्र परदेशी, फारक शेख, अलीरजाकान, सोनू परदेशी, दीपक गढरी,व छत्रपती शिवराय बचत गटाचे कार्यकर्ते, आद़ीनी परिश्रम घेतले. शिबिरासाठी गोळवलकर रक्तपेढीचे
मधुकर सैंदाणे, श्रीकांत मंडले व संजय पाटील यांनी सहकार्य केले.