आंबेडकर जयंतीला जामनेर येथे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 18:37 IST2020-04-14T18:35:20+5:302020-04-14T18:37:46+5:30
बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालयात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.

आंबेडकर जयंतीला जामनेर येथे रक्तदान
ठळक मुद्दे८२ कार्यकर्त्यांनी केले रक्तदानमहाविकास आघाडीचा पुढाकार
जामनेर, जि.जळगाव : बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालयात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. ८२ जणांनी रक्तदान केले. पालिका, तहसील, पंचायत समिती व पोलीस कार्यालयात प्रतिमेचे पूजन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नेते संजय गरुड, दगडू पाटील, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील यांनी अभिवादन केले. शंकर राजपूत, मूलचंद नाईक, गणेश झालटे, किरण पाटील, दीपक राजपूत, मुसा पिजारी, अशपाक पटेल, शशिकांत पाटील, किशोर पाटील, पवन माळी, राजू खरे, शक्ती सुरवाडे यांनी सहकार्य केले.