रावेर येथे शिबिरात ७० युवकांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 20:52 IST2020-09-19T20:52:29+5:302020-09-19T20:52:49+5:30

भाजप युवा मोर्चातर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित रक्तदान शिबिरात १९ रोजी ७० युवा कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.

Blood donation of 70 youths in Raver camp | रावेर येथे शिबिरात ७० युवकांचे रक्तदान

रावेर येथे शिबिरात ७० युवकांचे रक्तदान

रावेर : भाजप युवा मोर्चातर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित रक्तदान शिबिरात १९ रोजी ७० युवा कार्यकर्त्यांनी रक्तदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७०वा वाढदिवस साजरा केला. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष रंजना पाटील होत्या.
उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चाचे संपर्कप्रमुख सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, लोकसभा संयोजक नंदू महाजन, माजी जिल्हा सरचिटणीस डॉ.विजय धांडे, जि.प.सदस्य कैलास सरोदे, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस सी.एस पाटील, महेश चौधरी, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रेखा बोंडे, कृ.उ.बा. सभापती श्रीकांत महाजन, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पाटील, पं.स.उपसभापती जुम्मा तडवी, शिवाजी पाटील, संदीप सावळे, भास्कर महाजन, मसाका संचालक गोपाळ नेमाडे, शहराध्यक्ष दिलीप पाटील, प्रसिद्धीप्रमुख नितीन पाटील, सेवा सप्ताह तालुका प्रमुख भूषण पाटील, शहर युवाध्यक्ष अजिंक्य वाणी, पुरोजीत चौधरी, सरपंच प्रमोद चौधरी, शुभम पाटील, नितीन पाटील , राजेंद्र पाटील, रोहन चहार्टे, शुभम मुर्हेकर, सागर भारंबे, बाळा आमोदकर, गणेश भोई, भाजप व युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ.माधवराव गोळवलकर रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलन केले.

Web Title: Blood donation of 70 youths in Raver camp