धरणगावला बालपणीच्या आठवणींनी माजी विद्यार्थ्यांच्या डोळ््यात आनंदाश्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 16:22 IST2019-03-24T16:22:16+5:302019-03-24T16:22:33+5:30
माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळावा

धरणगावला बालपणीच्या आठवणींनी माजी विद्यार्थ्यांच्या डोळ््यात आनंदाश्रू
धरणगाव : पी.आर.हायस्कूलमधील १९८५च्या इयत्ता १०वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळावा झाला. या वेळी बालपणीच्या आठवणींनी अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
स्टार १९८५ या कार्यक्रमाचे विवेक व्यास, राजेश लोथे, विजय पवार यांनी नियोजन केले. विवेक व्यास, प्रा.सम्राट परिहार यांचे स्वागत मुख्याध्यापक बी.एन. चौधरी, पर्यवेक्षक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी केले. माजी विद्यार्थी शरदकुमार बन्सी यांनी आभार मानले. यावेळी शाळेच्या गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य देण्याचे ठरविण्यात आले. विक्रीकर आयुक्त सुरेश ठाकूर, सीए दिनेश कुळकर्णी, इंजिनियर एस.वाय. पाटील, अभियंता चंदू रावतोळे, शानोद्दिन शेख, राजेश लोथे, चित्रकार राजू कोतकर आदींनी मनोगतत व्यक्त केले. विठ्ठल काबरे, डी.एन.पाटील, केवल भाटीया, नीलेश पारेख, प्रभाकर झांबरे, राहुल जैन, मिलिंद डहाळे आदींनी सहभाग नोंदविला. राज्यभरात ठिकठिकाणी असलेले माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.