शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

शेंदुर्णीत भाजपाची ‘महाजनकी’ सरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 2:58 PM

जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या पहिल्या-वाहिल्या निवडणुकीत मतदारांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा शिक्कामोर्तब करीत भाजपाला विजयी कौल दिला आहे. १७ पैकी १३ जागा जिंकत भाजपाने आपल्याकडे सत्ता कायम राखली आहे. भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजया खलसे यांनी राष्ट्रवादीच्या क्षितीजा गरूड यांचा २४९२ मतांनी पराभव केला.

ठळक मुद्देभाजपाला सर्वाधिक १३ जागांवर विजयराष्ट्रवादीला केवळ तीन जागाशिवसेना व मनसेची दाणादाण

जळगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या पहिल्या-वाहिल्या निवडणुकीत मतदारांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा शिक्कामोर्तब करीत भाजपाला विजयी कौल दिला आहे. १७ पैकी १३ जागा जिंकत भाजपाने आपल्याकडे सत्ता कायम राखली आहे. भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजया खलसे यांनी राष्ट्रवादीच्या क्षितीजा गरूड यांचा २४९२ मतांनी पराभव केला.स्थापनेनंतर पहिल्यांदाच झालेल्या शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपा, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी, शिवसेना, मनसे व काही अपक्षांनी निवडणूक लढविली. मतमोजणीनंतर भाजपा हा सर्वात मोठा पक्ष राहिला आहे.सोमवारी सकाळी १० वाजेपासून माहेश्वरी मंगल कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रभाग १ मधील भाजपा उमेदवार रंजना धुमाळ यांनी विजयी सलामी दिली. यानंतर भाजपाची विजयाकडे घौडदौड कायम सुरु राहिली.सुरुवातीपासून नगराध्यक्षपदाच्या भाजपाच्या उमेदवार विजया खलसे व राष्ट्रवादीच्या क्षितीजा गरूड यांच्यात काट्याची लढत सुरु होती. पहिल्या फेरीत क्षितीजा गरूड या २५० मतांनी पुढे होत्या. त्यानंतर चौथ्या फेरी अखेर मात्र खलसे यांनी मुसंडी मारत ९८१ मतांनी आघाडी घेतली. या तुलनेत नगराध्यक्षपदाच्या शिवसेनेच्या मनिषा बारी व मनसेच्या सरिता चौधरी या पिछाडीवर राहिल्या. अखेर भाजपाच्या विजया खलसे यांना ७७४५ मते मिळवून विजयी झाल्या.

वृषाली गुजर दोन मतांनी विजयीप्रभाग १४ मध्ये राष्ट्रवादीच्या वृषाली गुजर (५२९ मते) यांनी भाजपाच्या मोनाली सूर्यवंशी (५२७ मते) यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला.भाजपाच्या विजया खलसे २४९२ मतांनी विजयीशेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवित नगराध्यक्षपदासह सर्व १८ उमेदवार दिले. भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजया खलसे यांना ७७४५ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या क्षितीजा गरुड यांना ५२५३, शिवसेनेच्या मनिषा बारी यांना १६८ तर मनसेच्या सरीता चौधरी यांना ८८ मते मिळाली. नोटा ६९ मते पडली. विजया खलसे या २४९२ मतांनी विजयी झाल्या.प्रभाग निहाय विजयी उमेदवार, त्यांचा पक्ष व मिळालेली मते अशी :१) रंजना धुमाळ (भाजपा-६३४)२) ज्योती गायकवाड (भाजपा- ४२४)३) गणेश पाटील (भाजपा- ४९२)४) चंद्रभागा धनगर (राष्टÑवादी-३१७)५) राहुल धनगर (भाजपा-४३१)६) चंदाबाई अग्रवाल (भाजपा- ५१२)७) भावना जैन (राष्टÑवादी-३२९)८) मोहसीना खाटीक (काँग्रेस-५०३)९) साधना बारी (भाजप- ५४९)१०) सतीश बारी (भाजप-४१६)११) श्याम गुजर (भाजप- ६००)१२) नीलेश थोरात (भाजपा- ३८७)१३) गणेश जोहरे (भाजप-३६४)१४) वृषाली गुजर (राष्टÑवादी-५२९)१५) अलीम तडवी (भाजप- ४७९)१६) शरद बारी (भाजप-४३१)१७) संगीता बारी (भाजप-५४३)

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाElectionनिवडणूकMNSमनसेShiv Senaशिवसेना