धुळे मनपा निवडणुकीत भाजपा ५० जागा जिंकणार : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 21:22 IST2018-08-25T21:19:44+5:302018-08-25T21:22:21+5:30

धुळे मनपा निवडणुकीत जळगाव मनपा निवडणुकीचा पॅटर्न वापरणार असून धुळे येथे भाजपाच्या किमान ५० जागा निवडून आणू असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

BJP will win 50 seats in Dhule municipal elections: Girish Mahajan | धुळे मनपा निवडणुकीत भाजपा ५० जागा जिंकणार : गिरीश महाजन

धुळे मनपा निवडणुकीत भाजपा ५० जागा जिंकणार : गिरीश महाजन

ठळक मुद्देगिरीश महाजन वापरणार जळगाव पॅटर्न वापरणार२०० कार्यकर्त्यांची टिम जळगावातून पाठविणारजळगावातील काही नगरसेवकांची घेणार मदत

जळगाव- धुळे मनपा निवडणुकीत जळगाव मनपा निवडणुकीचा पॅटर्न वापरणार असून धुळे येथे भाजपाच्या किमान ५० जागा निवडून आणू असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
जळगाव येथे भाजपा कार्यालयात आयोजित नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, जळगावकरांनी भाजपावर विश्वास ठेवून आपल्याला भरघोस मतदान करीत ५७ जागांवर विजय मिळवून दिला. हा विक्रमी विजय ठरला असून धुळे मनपा निवडणुकीतही असाच चमत्कार घडवून दाखवू असा दावाही त्यांनी केला.
२०० कार्यकर्त्यांची टिम जळगावातून पाठविणार
पालघर पोटनिवडणूक, नाशिक मनपा, जामनेर पालिका, जळगाव मनपा अशी लागोपाठ विजयाची मालिका आपल्या नेतृत्वाखाली आपण यशस्वी केली. यामुळेच आता धुळे येथेही ३ जागांवरुन किमान ५० जागा आपल्याला मिळवायच्या आहेत. यासाठी २०० कार्यकर्त्यांची टिम येथून धुळ्यात पाठविणार असून जळगावच्या काही नगरसेवकांचीही निवडणूक प्रचारादरम्यान मदत घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: BJP will win 50 seats in Dhule municipal elections: Girish Mahajan