भाजप मेळाव्यापूर्वी खुर्च्यांची तोडफोड केल्याने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 14:18 IST2019-09-23T14:09:21+5:302019-09-23T14:18:52+5:30
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी ता. धरणगावात आज (सोमवार) भाजपचा मेळावा सुरु आहे.

भाजप मेळाव्यापूर्वी खुर्च्यांची तोडफोड केल्याने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
जळगाव: सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी ता. धरणगावात आज (सोमवार) भाजपचा मेळावा सुरु आहे. मात्र या मेळाव्यास्थळी मध्यरात्री काही जणांनी येऊन खुर्च्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. तसेच काही स्वयंपाक करणाऱ्या लोकांना मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, या संदर्भात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आले असता युतीमधील कोणतेही कार्यकर्ते असं काम करणार नाही. तसेच ज्या लोकांनी खुर्च्यांची तोडफोड केली आहे, त्यांनी स्टंटबाजीसाठी हा प्रकार केल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.