शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

Girish Mahajan : "खोट बोल पण नेटाने बोल... ही म्हण संजय राऊतांना तंतोतंत लागू , पाप-पुण्य जनतेसमोर आलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 12:51 IST

BJP Girish Mahajan Slams Shivsena Sanjay Raut : प्रसिध्दीसाठी मोठ मोठ्याने बोलायच एवढंच काम संजय राऊत यांना येतं या शब्दात भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना टीकेचे लक्ष केले आहे.

जळगाव - खोट बोल पण नेटाने बोल ही म्हण तंतोतंत शिवसेनेचे संजय राऊत यांना लागू पडते. संजय राऊत आरोपांच्या बाबतीत नुसत्याच डरकाळ्या फोडत असतात. ते जे बोलताहेत ते कुठे सत्य झालं का? नुसत्याच वल्गणा करायच्या, प्रसिध्दीसाठी मोठ मोठ्याने बोलायच एवढंच काम संजय राऊत यांना येतं या शब्दात भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना टीकेचे लक्ष केले आहे.

बेकायदेशीपणे एकही रुपया अथवा जमीन सापडली तर मी भाजपला दान करुन देईन, असे वक्तव्य ईडीने केलेल्या कारवाईनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यावर जामनेर येथे निवासस्थानी भाजपचे नेते गिरीश महाजन हे पत्रकारांशी बोलत होते. सगळी चौकशी होईल, सगळे पेपर समोर येतील, तेव्हा जनतेसमोर सर्व गोष्टी येतील, त्यामुळे खासदार संजय राऊत हे काहीही बोलत असले तरी त्या गोष्टीला आता अर्थ उरलेला नाही.

काही तरी असल्याशिवाय ईडी कारवाई करणार नाही, माझा खून होणार आहे अस तोंडात येईल ते वाट्टेल ती काहीही बडबड आता संजय राऊत करताहेत, फाट्यावर मारतो अन् लाठ्यावर मारतो, असे राऊत यांनी म्हटलं तरी आता काहीही होणार नाही. आता संजय राऊत यांना कुठलीही सहानुभूती आता मिळणार नाहीये, या ईडीच्या कारवाईच्या निमित्ताने राऊत यांनी केलेले सर्व पाप आणि पुण्य हे जनतेच्या समोर आलेलं आहे, आता थोड थांबा. अस म्हणत  गिरीश महाजन यांनी राऊत यांना एकप्रकारे इशाराही दिला आहे.

राज्यात आता कुठेही कायदा व सुव्यवस्था शिल्लक राहिलेला नाही, राज्याचे गृहमंत्रीच, मोठ मोठे पोलीस अधीकारी जेलमध्ये जावून बसले आहेत, अनेक चौकशीच्या फेऱ्यात आहेत. असे म्हणत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवरही टीकेची झोड उठवली. पोलीस बदल्याच्या बाबतीत मोठा बाजार मांडला गेला. आणि पैसे वसुल करण्याच्या भानगडीत हे पडले आहेत, अनेक मंत्री जेलच्या वाऱ्या करताहेत, इतकी वाईट परिस्थिती पहिल्यांदाच राज्यात झालीय, पोलिसांना बदल्यांसाठी मोठ्याप्रमाणावर पैसे मागितले जाताहेत, यामुळे त्यांच खच्चीकरण होतंय, गुंड मोकाट सुटले आहेत, एवढी विदारक परिस्थिती राज्याची आहे, मात्र हे पाहायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही असे म्हणत गिरीश महाजन यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्दयावर ठाकरे सरकारचा जोरदार समाचार घेतला. 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय