मुक्ताईनगरला मुक्ताई मंदिरात भाजपतर्फे घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 14:47 IST2020-08-29T14:47:12+5:302020-08-29T14:47:37+5:30
शनिवारी जुने मुक्ताई मंदिर कोथळी, ता.मुक्ताईनगर येथे भाजपतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

मुक्ताईनगरला मुक्ताई मंदिरात भाजपतर्फे घंटानाद आंदोलन
मुक्ताईनगर, जि.जळगाव : राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारने जागतिक कोरोना संकट काळात दारूची दुकाने उघडी केलीत, बाजारपेठा उघड्या केल्यात, बाजारात प्रचंड गर्दी, मात्र भक्तांच्या भावना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मंदिरे बंद ठेवलीत मंदिरे सुरू करा या मागणीसाठी शनिवारी सकाळी ११.३० वाजता जुने मुक्ताई मंदिर कोथळी, ता.मुक्ताईनगर येथे भाजपतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, पं.स. सभापती विद्या पाटील, नगराध्यक्षा नजमा तडवी, जि.प. सदस्या वैशाली तायडे, जि.प. सदस्य नीलेश पाटील, तालुका उपाध्यक्ष मोहन महाजन, विनायक पाटील, तालुका सरचिटणीस सुनील काटे, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, माजी तालुका सरचिटणीस संदीप देशमुख, भाजयुमो विधानसभा क्षेत्रप्रमुख दत्ता पाटील, पं.स.चे मजाी सभापती राजू माळी, नीलेश मालवेकर, शिवराज पाटील, प्रशांत महाजन, अजय भारंबे, पराग पाटील, पंकज येवले, मुन्ना बोनडे आदी उपस्थित होते