शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पातोंड्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा आठ जणांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:29 PM

सोमवारी सकाळ पासून पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांना चावा घेऊन जखमी केले. यात सहा बालकांसह दोन वृद्ध महिलांचा समावेश आहे.

ठळक मुद्देकुत्र्याच्या हल्ल्यात दोन वृद्ध महिला जखमी

पातोंडा, ता. अमळनेर : येथे सोमवारी सकाळ पासून पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांना चावा घेऊन जखमी केले. यात सहा बालकांसह दोन वृद्ध महिलांचा समावेश आहे. पिसाळलेल्या कुत्र्याला दक्षिणीमुखी हनुमान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मारून विल्हेवाट लावली.पातोंडा येथील ओम संतोष पवार (वय ६) हा विद्यार्थी शाळेतून घरी येत असतांना कुत्र्याने त्याच्या पाय व मांडीला चावा घेतला. कैलास रामलाल पावरा (वय ४) याच्या उजव्या हाताला व रईलास रामलाल पावरा (वय ५) या दोन्ही भावंडांना ते खेळत असतांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. अभय बापू कोळी (वय १३) व भावेश पुरुषोत्तम पाटील (वय ३) हे दोन्ही मुल अंगणात खेळत असतांना त्यांनाही चावा घेतला. प्रज्ञा कचरू संदानशिव (वय १७) या मुलीला चावा घेतला. त्याच बरोबर दत्त मंदिर चौकातील रमाबाई भिकन सुतार (वय ५८) ही महिला दुपारी घरात असतांना अचानक पिसाळलेला कुत्रा घरात घुसून या महिलेला चावा घेतला.इंदूबाई वसंत लोहार (वय ६५) ही वृद्ध महिला घराच्या व्हरांड्यात बसली होती. त्यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या डावा पायाला चावा घेऊन गंभीर जखमी केले. त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी धुळे येथे पुढील उपचारासाठी पाठवले.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेर