भुसावळात टँँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 17:05 IST2017-10-19T17:01:57+5:302017-10-19T17:05:17+5:30
भुसावळ, १९ : भुसावळ हायस्कूलजवळ गुरुवारी सकाळी सात वाजता टँकर व दुचाकीच्या धडकेत रतनसिंग बाबूसिंग चव्हाण (४४) यांचा जागीच मृत्यू झाला.

भुसावळात टँँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
आॅनलाईन लोकमत
भुसावळ, १९ : भुसावळ हायस्कूलजवळ गुरुवारी सकाळी सात वाजता टँकर व दुचाकीच्या धडकेत रतनसिंग बाबूसिंग चव्हाण (४४) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. टँकरच्या चालकास अटक करण्यात आली आहे.
टँकर क्रमांक (एम.एच.१५ डी.के.७६६०) नाशिक येथून येत होता. या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात रतनसिंग बाबूसिंग चव्हाण हे जागीच ठार झाले. टँकरचालक सिद्धार्थ रतन खंडारे (रा.तुरडा, कजबा, ता.शेगाव, जि.बुलढाणा) याला अटक करण्यात आली असून याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४, २७९, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.