रामकृष्ण अपार्टमेंटमधून दुचाकी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 22:39 IST2019-11-12T22:38:36+5:302019-11-12T22:39:24+5:30
जळगाव - गणेश कॉलनी परिसरातील रामकृष्ण अपार्टमेंटच्या पार्किंगमधून राजेंद्र बाबुलाल अग्रवाल यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना मंगळवारी ...

रामकृष्ण अपार्टमेंटमधून दुचाकी चोरी
जळगाव- गणेश कॉलनी परिसरातील रामकृष्ण अपार्टमेंटच्या पार्किंगमधून राजेंद्र बाबुलाल अग्रवाल यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे़ याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गणेश कॉलनी परिसरातील रामकृष्ण अपार्टमेंटमध्ये राजेंद्र अग्रवाल हे कुटूंबीयांसोबत राहतात़ शनिवार, ९ नोव्हेंबर रोजी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास राजेंद्र अग्रवाल यांची मुलगी रक्षा हीने अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये एमएच़१९़एए़७७२६ ही मोपेड दुचाकी उभी केली होती़ दरम्यान, दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास राजेंद्र हे कामावर जाण्यासाठी पार्किंगजवळ आले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही़ आजू-बाजूला शोध घेतल्यानंतर दुचाकी मिळून न आल्याने ती चोरीला गेल्याची खात्री त्यांना झाली़ अखेर मंगळवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़