बळीरामपेठेतून दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 22:34 IST2019-11-22T22:33:49+5:302019-11-22T22:34:02+5:30
जळगाव - बळिराम पेठ येथील किशोर एजन्सीच्या समोरून १८ नोव्हेबरला चोरट्याने दुचाकी चोरल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. नीलेश नारायण ...

बळीरामपेठेतून दुचाकी लंपास
जळगाव- बळिराम पेठ येथील किशोर एजन्सीच्या समोरून १८ नोव्हेबरला चोरट्याने दुचाकी चोरल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.
नीलेश नारायण सुर्यवंशी यांनी किशोर एजन्सीच्या समोर त्यांची (एमएच़१९़ बीव्ही. २७६७) या क्रमांकाची दुचाकी लावली होती. सायंकाळी सहा ते आठ च्या दरम्यान चोरट्याने ही दुचाकी चोरली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास गणेश शिरसाळे करीत आहे़