चांदी १३,००० तर सोने ३,५०० रुपयांनी घसरले
By विजय.सैतवाल | Updated: March 3, 2026 17:25 IST2026-03-03T17:25:23+5:302026-03-03T17:25:39+5:30
सलग चार दिवस भाववाढ झालेल्या सोने-चांदीच्या भावात ३ मार्च रोजी घसरण झाली.

चांदी १३,००० तर सोने ३,५०० रुपयांनी घसरले
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : सलग चार दिवस भाववाढ झालेल्या सोने-चांदीच्या भावात ३ मार्च रोजी घसरण झाली. चांदीचे भाव १३ हजार रुपयांनी कमी होऊन दोन लाख ८५ हजार रुपयांवर आले. सोन्याच्या भावात तीन हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ते एक लाख ६५ हजार रुपयांवर आले.
२६ फेब्रुवारी रोजी चांदीमध्ये १० हजारांची घसरण झाल्यानंतर २७ फेब्रुवारीपासून चार दिवस भाववाढ होत गेली. १ मार्च रोजी ५ हजार रुपयांच्या वाढीने २ लाख ९५ हजार रुपयांवर पोहचलेल्या चांदीच्या भावात २ रोजी ३ हजार रुपयांची वाढ झाली व चांदी २ लाख ९८ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली होती. मात्र ३ रोजी एकाच दिवसात १३ हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी दोन लाख ८५ हजार रुपये प्रति किलोवर आली.
सोन्याच्या भावात २ मार्च रोजी २ हजार ३०० रुपयांची घसरण होऊन ते १ लाख ६८ हजार ५०० रुपयांवर आले होते. त्यात ३ मार्च रोजी पुन्हा तीन हजार ५०० रुपयांची घसरण होऊन सोने एक लाख ६५ हजार रुपये प्रति तोळ्यावर आले.