मुक्ताईनगरात भाजपला धक्का! नगराध्यक्षा नजमा तडवी अपात्र घोषीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 18:52 IST2021-11-08T18:52:35+5:302021-11-08T18:52:53+5:30
जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने मुक्ताईनगर येथील भाजपच्या नगराध्यक्षा नजमा तडवी यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.

मुक्ताईनगरात भाजपला धक्का! नगराध्यक्षा नजमा तडवी अपात्र घोषीत
मुक्ताईनगर जि. जळगाव : जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने मुक्ताईनगर येथील भाजपच्या नगराध्यक्षा नजमा तडवी यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. सन २०१८ मध्ये मुक्ताईनगर नगरपरिषदेची निवडणूक झाली होती. या नंतर दिलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र तडवी यांनी सादर केले नाही, अशा आशयाची तक्रार गिरीश चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती. त्यावर सुनावणी होवून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निकाल दिला आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी उपनगराध्यक्षांसह १७ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक तक्रार अर्ज दिला होता. त्यात तडवी ह्या आम्हास विश्वासात घेत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. आता तडवी यांना अपात्र घोषित करण्यात आल्याने भाजप आणि खडसे गटाला हा धक्का मानला जात आहे.