Bhushan Singhraj Holkar visits Pachora city | भूषणसिंहराजे होळकर यांची पाचोरा शहराला भेट

भूषणसिंहराजे होळकर यांची पाचोरा शहराला भेट

ठळक मुद्देसमाजबांधवांशी केली चर्चाहोळकर घराण्याचा सांगितला इतिहास

पाचोरा, जि.जळगाव : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर राजघराण्याचे तेरावे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर हे सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, नुकतेच त्यांचे पाचोरा येथे आगमन झाले. याप्रसंगी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करण्यात आले. त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
त्यांच्यासोबत अशोकराव थिटे, विनायक साळसकर, अनिकेत देसाई, विठ्ठल शिंगाडे, बापू लेणेकर, प्रा. प्रकाश थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यांनी सर्व समाज बांधवांशी संवाद साधला व महत्वाची चर्चा केली. त्यांनी होळकर घराण्याच्या वैभवशाली परंपरेचा इतिहास सर्व समाजबांधवांना कथन केला. प्रा.डॉ.अतुल सूर्यवंशी यांना इंग्रजी विषयात पीएच. डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.
नगरसेवक बापू हटकर, किशोर पेंढारकर, श्रीराम पाटील, मच्छिंद्र थोरात, योगेश हटकर, संजय परदेशी, विशाल धनगर, सुनील धनगर, नामदेव धनगर, नाना धनगर, गुलाब हटकर, संतोष हटकर, रमेश हटकर, विशाल हटकर, सुभाष हटकर, निवृत्ती हटकर, मधु हटकर, ईश्वर धनगर, भिका हटकर, लक्ष्मण हटकर, गुलाब हटकर, सुखदेव धनगर आदी मान्यवर उपस्थित होते.
 

Web Title: Bhushan Singhraj Holkar visits Pachora city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.