भुसावळ अंधारात, वीज खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यासह व्यावसायिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:13 AM2021-06-24T04:13:47+5:302021-06-24T04:13:47+5:30

भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे कार्य सुरू असून रेल्वे उड्डाणपुलाजवळ टाकण्यात आलेली ते ३३ के.व्ही. केबल किट जळाल्यामुळे ...

In Bhusawal darkness, the condition of traders including water supply due to power outage | भुसावळ अंधारात, वीज खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यासह व्यावसायिकांचे हाल

भुसावळ अंधारात, वीज खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यासह व्यावसायिकांचे हाल

googlenewsNext

भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे कार्य सुरू असून रेल्वे उड्डाणपुलाजवळ टाकण्यात आलेली ते ३३ के.व्ही. केबल किट जळाल्यामुळे त्याचा परिणाम शहरातील वीजपुरवठ्यावर झाला आहे. उत्तर भागासह शहराच्या अनेक ठिकाणी सकाळी अकरा वाजेपासून वीजपुरवठा खंडित झाला असून यामुळे पाणीपुरवठाही दोन दिवस उशिराने होणार आहे. तसेच व्यवसायिकांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले

महामार्गाचे काम सुरू असून खेडी १३२ उपकेंद्रावरून तापी नगर केंद्राला वीजजोडणी करणाऱ्या अंडर ग्राउंड ३३ के.व्ही. टेबल किट जळाल्याचा परिणाम शहराच्या विद्युत पुरवठा झाला आहे. दुरुस्तीसाठी जळगाव येथून विशेष पथक बोलावण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत साकेगाववरून वीज जोडणी करण्यासाठी प्रयत्न सुरू हे वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता पी.आर.घोरूडे, विभागीय अभियंता रवींद्र पद्मे व लाईनमन स्टॉप घटनास्थळी थांबून आहेत.

Web Title: In Bhusawal darkness, the condition of traders including water supply due to power outage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.