भुसावळातील पसार इराणी महिलेस दोन वर्षानी अटक
By Admin | Updated: June 3, 2017 17:45 IST2017-06-03T17:45:51+5:302017-06-03T17:45:51+5:30
शब्बो जबीनअली ईराणी (30, भुसावळ) अस अटकेतील महिलेचे नाव आह़े

भुसावळातील पसार इराणी महिलेस दोन वर्षानी अटक
ऑनलाईन लोकमत
भुसावळ, जळगाव, दि. 3 - धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवणा:या टोळीतील आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करणा:या इराणी महिलेस तब्बल दोन वर्षानी पकडण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आल़े शब्बो जबीनअली ईराणी (30, भुसावळ) अस अटकेतील महिलेचे नाव आह़े
2015 मध्ये मुजायदीन उर्फ बावडू छोटू इराणी या आरोपीस पकडण्यासाठी बाजारपेठ पोलिसांचे पथक इराणी वस्तीत गेल्यानंतर शब्बो इराणीसह अन्य महिलांनी पोलिसांवर हल्ला केला होता़ या प्रकरणी गुरनं़156/2015, भादंवि 353, 341, 332, 337, 148, 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्हा घडल्यानंतर महिला आरोपी पसार झाल्या होत्या़ शुक्रवारी ही महिला रावेर येथे बाजारात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला मात्र पोलीस कारवाईचा सुगावा लागताच ती रेल्वेने भुसावळात पसार झाली मात्र शनिवारी दुपारी रेल्वे स्थानक परीसरात तिला अटक करण्यात आली़
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज ठाकरे, एएसअय आनंदसिंग पाटील, नाईक शंकर पाटील, प्रवीण पाटील, आनंदा भोर, कॉन्स्टेबल विकास सातदिवे आश्विनी इंगळे आदींच्या पथकाने केली़