भोरगाव लेवा पंचायतीच्या पुढाकाराने तुटणारा ‘संसार रथ रुळावर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 15:06 IST2021-04-14T15:05:50+5:302021-04-14T15:06:38+5:30

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भोरगाव लेवा पंचायतीचा पुढाकार  घेतला आहे.

Bhorgaon Leva Panchayat's initiative breaks 'Sansar Rath on track' | भोरगाव लेवा पंचायतीच्या पुढाकाराने तुटणारा ‘संसार रथ रुळावर’

भोरगाव लेवा पंचायतीच्या पुढाकाराने तुटणारा ‘संसार रथ रुळावर’

भुसावळ : तीन वर्षापूर्वी विवाह झालेला परंतु घटस्फोटापर्यंत गोष्ट पोहोचलेला एक ‘संसार रथ’ भोरगाव लेवा पंचायतीच्या भुसावळ शाखेने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एकत्र आणला. लेवा पंचायतीच्या मान्यवरांनी यासाठी घेतलेल्या पुढाकाराला यश आले आहे.
आसोदे येथील भूषण चिरमाडे व  गोजोरे येथील कीर्ती उर्फ भारती  यांचा २०१८ मधे विवाह झाला. विवाहानंतर  एक वर्ष सर्व चांगले सुरळीत सुरू होते. पण हळूहळू त्यांच्यात वादविवाद  सुरू झाले. या दरम्यान त्यांना बाळसुध्दा झाले. पण छोट्या-छोट्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन कीर्ती बाळाला घेऊन माहेरी गोजोरे येथे आली. काही दिवसांनी भुसावळ येथील भोरपंचायत कार्यालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. परंतु समुपदेशन कक्षात कीर्ती व भूषण दोघांचे आधी वैयक्तिक व नंतर एकत्र समुपदेशन केल्यानंतर दोघांनी घटस्फोटाचा विचार रद्द करुन एकत्र संसार करण्याची इच्छा व्यक्त केली.
सचिव डाॅ.बाळू पाटील व अध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील यांनी पुढाकार घेऊन सर्व कायदेशीर बाबींची/ कागदपत्रांची पूर्तता करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भुसावळ शाखेचे अध्यक्ष अॅड प्रकाश पाटील, सचिव डाॅ. बाळू पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, समुपदेशन कक्षाच्या चेअरमन  आरती चौधरी, सदस्य मंगला पाटील व जयश्री चौधरी यांच्या उपस्थितीत कीर्तीला सासरी पाठवण्यात आले.
कीर्ती व भूषणला सर्व सदस्यांनी आशीर्वाद देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

Web Title: Bhorgaon Leva Panchayat's initiative breaks 'Sansar Rath on track'