शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
5
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
6
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
7
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
8
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
9
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
10
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
11
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
12
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
13
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
14
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
15
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
16
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
17
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
18
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
19
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
20
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!

भूतदया...सोनाळे येथील मृत वानराचे ग्रामस्थांनी केले उत्तरकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 5:29 PM

वानराच्या मृत्यूचा दुखवटा म्हणून पाच युवकांनी केले केशदान

ठळक मुद्देतेराव्या दिवशी माकडाच्या गंधमुक्तीचा कार्यक्रमह. भ. प.बाळकृष्ण महाराज वाकोदकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम वानराच्या मृत्यूचे दु:ख म्हणून गावातील पाच तरुणांनी केले केशदान

आॅनलाईन लोकमतपाळधी ता. जामनेर,दि.१९ : सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुक्या प्राण्यावरील होणारे हल्ले आणि अमानुष छळाच्या घटना व्हायरल होत असताना जामनेर तालुक्यातील सोनाळे येथील ग्रामस्थांनी मृत वानराचे एखाद्या मृत व्यक्तीप्रमाणे उत्तरकार्य करीत भूतदया जोपासली आहे. या वानराच्या मृत्यूचे दु:ख म्हणून गावातील पाच तरुणांनी केशदान देखील केले आहे.जामनेर तालुक्यातील सोनाळे येथे एक वानर झाडावर उड्या मारत असताना त्याचा तोल गेला. ते वानर जमिनीवर पडून गंभीर जखमी झाले. त्यानंतर कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला करीत ठार केले. ही घटना गावातील नागरीकांना समजली. त्यांनी माकडाचा मनुष्याप्रमाणे अंत्यविधी केला. दहाव्या दिवशी दशक्रिया विधी करीत सचिन पाटील, समाधान पाटील, शांताराम पाटील, सागर पाटील, अतुल पाटील या युवकांनी केशदान केले. पंढरी पाटील, राजु पाटील, बबलू पाटील, स्वप्निल चौधरी, नीलेश पाटील, बाळू पाटील, सुभाष पाटील यांनी उत्तरकार्यात सहभाग नोंदविला.तेराव्या दिवशी माकडाच्या गंधमुक्तीचा कार्यक्रम केला. सकाळी ५०० ते ६०० लोकांना वरण, पोळी, भात, भाजी असा अन्नदानाचा कार्यक्रम केला. रात्री ह. भ. प.बाळकृष्ण महाराज वाकोदकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. युवकांच्या या भूतदयेबाबत सरपंच, उपसरपंच तसेच सोनाळे पंचक्रोशीतील वन्यप्रेमींनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :JalgaonजळगावMonkeyमाकडJamnerजामनेर