गावठी दारू विक्री करणाऱ्यांची जामनेरात काढली धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 14:58 IST2020-03-30T14:57:28+5:302020-03-30T14:58:56+5:30

संचारबंदी काळात फिरस्तीवर असलेल्या पोलिसांनी सोमवारी दुपारी कांग नदी पात्रात गावठी दारू विकणाºया दोन जणांची गावातून धिंड काढली.

Bhandi drunk in the bail salesmen | गावठी दारू विक्री करणाऱ्यांची जामनेरात काढली धिंड

गावठी दारू विक्री करणाऱ्यांची जामनेरात काढली धिंड

ठळक मुद्देपोलिसांच्या भूमिकेमुळे इतरांमध्ये दहशतहाच पवित्रा कायम ठेवण्याची त्रस्त नागरिकांची अपेक्षा

जामनेर : संचारबंदी काळात फिरस्तीवर असलेल्या पोलिसांनी सोमवारी दुपारी कांग नदी पात्रात गावठी दारू विकणाºया दोन जणांची गावातून धिंड काढली. राजू शिंदे, सुभाष शिंदे अशी या दोघा संशयितांची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, रामदास कुंभार, संजय मोरे, रियाज शेख, किशोर परदेशी, प्रकाश चिंचोरे कारवाई केली. दारू विकणाऱ्यांंची पोलिसांनी मेनरोडवरुन धिं काढली. त्यांच्याकडून १५ लीटर गावठी दारू जप्त केली.
पोलिसांनी आज घेतलेल्या या भूमिकेचे जनमानसात कौतुक होत आहे. नव्हे तर पोलिसांनी हाच पवित्रा कायम ठेवावा, अशी अपेक्षा त्रस्त नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Bhandi drunk in the bail salesmen