Bhalshiv's youth killed in two-wheeler accident | दुचाकी अपघातात भालशीवचा तरुण ठार

दुचाकी अपघातात भालशीवचा तरुण ठार

भादलीजवळ अपघात : दोन जखमी

जळगाव : तीन सीट असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत टिनू ऊर्फ छगन देवराम तायडे (वय ३२) हा तरुण जागीच ठार झाला, तर सुधाकर महारू कोळी(वय ४०) व धनराज शामराव सोनवणे (वय ४१) हे दोघे जखमी झाले. हा अपघात बुधवारी रात्री साडेआठ वाजता भादली गावाजवळ झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील भालशिव गावातील रहिवासी सुधाकर कोळी यांच्या मुलीचा जळगाव तालुक्यातील खेडी कढोली येथे बुधवारी विवाह होता. मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा आटोपला. त्यानंतर नातेवाईक घरोघरी निघून गेले. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टिनू ऊर्फ छगन देवराम तायडे, सुधाकर महारू कोळी व धनराज शामराव सोनवणे असे तिघेही एकाच दुचाकीने असोदा, भादली, शेळगाव बॅरेज ओलांडून यावल तालुक्याच्या दिशेने जाण्यासाठी निघाले. भादली गावादरम्यान त्यांच्या दुचाकीला समोरून सुसाट वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात होऊन त्यात टिनू ऊर्फ छगन देवराम कोळी यांचे जागीच निधन झाले. तर, दुचाकीवरील सुधाकर व धनराज असे दोघेही गंभीर जखमी झाले. मयत व जखमीला जिल्‍हा रुग्णालयात आणण्यात आले. टिनू छगन देवराम याच्या पश्चात मुलगी दिव्या, मुलगा, हितेश, पत्नी रंजना, आई सुमनबाई असा परिवार आहे.

Web Title: Bhalshiv's youth killed in two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.