कासोदा येथे लाडशाखीय वाणी समाज सभामंडपाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 17:00 IST2018-08-29T17:00:17+5:302018-08-29T17:00:39+5:30

समाजातील गुणवंत व पालकांचा गौरव

Bhaibupujan of Sadashim Sammand Mandir at Kasododa at Ladakhakariya Vani Samaj Mandandap | कासोदा येथे लाडशाखीय वाणी समाज सभामंडपाचे भूमिपूजन

कासोदा येथे लाडशाखीय वाणी समाज सभामंडपाचे भूमिपूजन

कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथील लाडशाखीय वाणी समाजाच्या १० लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे भूमिपूजन आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या हस्ते येथे करण्यात आले आहे. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा गौरवदेखील करण्यात आला.
यावेळी गजानन मालपुरे, महानंदा पाटील, विजय चिंचोले, ज्ञानेश्वर मेणे, शालिनी कोठावदे, किरण वाणी, अनिता पाखले, रघुनाथ कोठावदे, शरद वाणी, सचिन शिरोळे, विलास चिंचोले, भैया राक्षे, मुक्तार पंजाबी, नंदू खैरनार, नरेश ठाकरे इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.
आमदार पाटील, गजानन मालपुरे, शालिनी कोठावदे, विजय चिंचोले यांनी मनोगत व्यक्त केले. सूरज शिरोळे यांच्या स्मृत्यर्थ जनार्दन शिरोळे यांच्यातर्फे समाजातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक प्रदीप बाविस्कर यांनी, तर सूत्रसंचालन प्रतिभा वाणी व नीता वाणी यांनी केले. सानिका पिंगळे हिने स्वागत गीत सादर केले. आभार विजय पिंगळे यांनी मानले.
यशस्वितेसाठी शरद नावरकर, योगेश पिंगळे, रमेश नगावकर, मनोहर वाणी, अशोक पाखले, राजेंद्र वाणी, भगवान धामणे, मधुकर चिंचोले, रवींद्र वाणी, अरूण चिंचोले, नीलेश कोतकर आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Bhaibupujan of Sadashim Sammand Mandir at Kasododa at Ladakhakariya Vani Samaj Mandandap