भडगाव तालुक्यात थंडीचा फटका : १०० एकरावरील बागायत बाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 17:50 IST2019-01-15T17:47:30+5:302019-01-15T17:50:24+5:30
दुष्काळातही मोठ्या कष्टाने फुलविलेल्या केळी बागा मागील महिनाभरापासून पडलेल्या थंडीच्या कडाक्यात सापडल्या आहेत.

भडगाव तालुक्यात थंडीचा फटका : १०० एकरावरील बागायत बाधीत
खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : दुष्काळातही मोठ्या कष्टाने फुलविलेल्या केळी बागा मागील महिनाभरापासून पडलेल्या थंडीच्या कडाक्यात सापडल्या आहेत. बात्सर येथील गिरणाकाठालगत असलेल्या १०० एकरावरील अंदाजे एक लाख केळीखोडाचे पाने, पोंगे थंडीने अक्षरश: सुकत बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
बात्सर येथील शेतकऱ्यांनी कृषीसहाय्यकास बोलावत १५ रोजी शिवारातील केळीबागांची दुर्दशा दाखवीत पंचनाम्याची व शासकीय मदतीची मागणी केली. यावेळी भास्कर भीमराव पाटील यांच्या बागेस प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीचा अंदाज घेण्यात आला. दरम्यान, बाधीत केळीउत्पादक शेतकºयांनी कृषि विभागाकडे नुकसानीसंदर्भात अर्ज देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
गिरणेला पिण्यासाठी सुटणाºया आवर्तनाचा लाभ नदीकाठावरील विहिरींना होतो. दुष्काळ असतानाही शेतकºयांनी ठिबक आदी नियोजनातून पाण्याचा काटकसरीने वापर करीत केळीबागा फुलवल्यात. मागील महिन्यापासून थंडीचा कहर होत बागा आपोआप पिवळ्या पडत करपल्या आहेत. पोंगेच सुकल्याने उत्पादनाच्या दृष्टीने केळीखोड निकामी होत आहे. तालुक्यात हा परिसर केळी उत्पादनात अग्रेसर आहे. मात्र या संकटाने शेतकरी हवालदील झाला आहे.
केळीबागेभोवती शेकोट्या पेटविणे, पहाटे बागेस पाणी देणे, द्रवरुप खते देणे आदी कृषि विभागाने सुचविलेल्या उपाययोजना करुनही फारसा लाभ होत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.