Being a Brahmin, your prediction does not come true, Khadse's forced criticism on Fadnavis | ब्राह्मण असल्यानं तुमचं भाकीत खरं ठरत नाही, खडसेंची फडणवीसांवर जबरी टीका

ब्राह्मण असल्यानं तुमचं भाकीत खरं ठरत नाही, खडसेंची फडणवीसांवर जबरी टीका

ठळक मुद्देनाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊ बद्दल बोलत आहात

जळगाव - माजीमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबरी टीका केलीय. सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस हे माशासारखे तडफडत आहेत. ते ब्राह्मण असले तरी त्यांची सरकार पडणार असल्याची भाकिते खरे ठरतं नसल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. खडसेंच्या या टीकेला भाजपा आमदार राम सातपुते यांनी उत्तर दिलंय. 

देवेंद्र फडणवीसांना, सत्ता कधी येईल यासाठी मला वाटतं रात्री बेरात्री पण त्यांना स्वप्न पडत असेल. सध्या सरकार पडणार असे ते सांगत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या तारखांचे भाकीत करत आहेत. ते ब्राह्मण असल्याने त्यांचं भाकीत खरे ठरेल असं मला वाटत होतं. मात्र, त्यांचं कोणतही भाकीत खरं ठरलेले नाही, असेही खडसेंनी म्हटले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधला. मात्र, खडसेंच्या या टीकास्त्रानंतर भाजपा आमदार राम सातपुते यांनी खडसेंवर जबरी प्रहार केलाय. 

''नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊ बद्दल बोलत आहात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप आमदार राम सातपुते यांनी केलाय. तसेच, निष्कलंक देवेंद्र फडणवीसांवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल,'' अशी घणाघाती टीका राम सातपुते यांनी एकनाथ खडसेंवर केली आहे. 

भाजपात अनेक आमदार नाराज
खडसे म्हणाले की, भाजपमध्ये ही अनेक आमदार नाराज आहे. त्यांची नाराजी कमी करण्यासाठी पुन्हा आपलं सरकार येणार असल्याचा आशावाद फडणवीस त्यांच्या आमदारांना देत आहेत. मात्र हे सरकार पडणार नाही आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. मात्र त्यांना याच ज्ञान नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

मोदींवरही साधला निशाणा
रेमडेसिवीर इंजेक्शनचा सध्या मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. मात्र हा तुटवडा केवळ केंद्र सरकारच्या धोरणामुळे आहे. आपले लोक संकटात असताना या इंजेक्शनची निर्यात करण्यात येत होती. ही निर्यात करण्यात आली नसती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. मात्र आपले पेशंट मेले तरी चालतील पण जगात आपलं नाव करण्यासाठी परवापर्यंत या इंजेक्शनची निर्यात सुरू ठेवली होती असंही खडसे यांनी म्हतलं आहे.
 

Web Title: Being a Brahmin, your prediction does not come true, Khadse's forced criticism on Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.