चाळीसगावात किराणा व्यावसायिकांचा बंद मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 14:04 IST2021-04-30T14:03:22+5:302021-04-30T14:04:23+5:30

प्रशासनाने योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याने व्यावसायिकांनी बंद मागे घेतला आहे.

Behind the closure of grocery traders in Chalisgaon | चाळीसगावात किराणा व्यावसायिकांचा बंद मागे

चाळीसगावात किराणा व्यावसायिकांचा बंद मागे

 

चाळीसगाव : किराणा असोसिएशनने प्रशासनाच्या नावाने  खंडणी व बोगस  पावती फाडणार तोतया अमिनोद्दीन शेख यावर  उचित कारवाई करावी या मागणीसाठी बुधवारी शहरातील सर्व किराणा दुकाने बंद होती. याबाबत प्रशासनाने योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याने व्यावसायिकांनी बंद मागे घेतला आहे.
 याबाबत खासदार  उन्मेष पाटील, आमदार  मंगेश चव्हाण यांनी उपविभागीय  अधिकारी साताळकर, तहसीलदार  अमोल मोरे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड  यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार संबंधितांनी आश्वासन दिल्यामुळे पुकारलेला बंद मागे घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष जितेंद्र देशमुख यांनी दिली.
 

Web Title: Behind the closure of grocery traders in Chalisgaon