कजगाव येथे पाणी योजनेच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:08 IST2018-04-10T19:08:56+5:302018-04-10T19:08:56+5:30
तितूर नदी वरील तब्बल दोन कोटी रुपये खर्चाची बहुप्रतिक्षीत राष्ट्रीय पेय जल योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. या योजनेच्या विहिरीस चांगले पाणी लागल्याने कजगाव चा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागेल बरोबरच फिल्टर केलेलं पाणी मिळणार असल्याने या मुळे कजगावकराना शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे

कजगाव येथे पाणी योजनेच्या कामाला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
कजगाव,ता.भडगाव : येथील तितूर नदी वरील तब्बल दोन कोटी रुपये खर्चाची बहुप्रतिक्षीत राष्ट्रीय पेय जल योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. या योजनेच्या विहिरीस चांगले पाणी लागल्याने कजगाव चा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागेल बरोबरच फिल्टर केलेलं पाणी मिळणार असल्याने या मुळे कजगावकराना शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे
कजगाव पासुन सुमारे दहा किमी अंतरावरून सावदे गावाजवळील गिरणा नदीवरून पाईपलाईनचे काम सुरू आहे. पाईपलाईन गळती, गिरणा नदी कोरडी यामुळे कजगावचा पाणी प्रश्न बिकट होत होता. माजी जि.प.सदस्य मंगेश पाटील यांनी सुमारे दोन कोटींची राष्ट्रीय पेय जल योजनेतून कजगावची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. या योजनेमुळे कजगावचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे.
पाचोरा उपविभागीय अधिकाºयांकडून पाहणी
एक कोटी ९१ लाख ५२७ रुपये खर्चाच्या या योजनेत पाणी पुरवठा करणारी तितुर नदीत विहीर, जलशुद्धीकरण केंद्र्र, दोन लाख लीटर क्षमतेची पाणी टाकी, पम्प हाऊस व गावात ९ कि.मी.पाईपलाईन या प्रमाणे या योजनेच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. त्याची पाहणी पाणीपुरवठा योजनेचे पाचोरा उपविभागीय उपअभियंता एस.एस.पवार यांनी नुकतीच केली.
कजगावसाठी तितूर नदीवर जिल्हा परिषदेतर्फे राष्ट्रीय पेय जल योजनेला मंजूरी मिळाली होती. तेव्हापासून या योजनेचे काम केव्हा सुरु होते याबाबत नागरिकांना प्रतीक्षा होती. राष्ट्रीय पेय जल योजनेच्या कामास काही महिन्यापूर्वी सुरवात झालेली आहे. या योजनेतंर्गत बांधण्यात आलेल्या विहिरीला चांगले पाणी लागल्यामुळे कजगावचा पाणी प्रश्न सुटणार आहे. या पाणीपुरवठा योजनेमुळे कजगांव हे संपूर्ण टंचाई मुक्त होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ ही योजना पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पाचोरा पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एस.एस.पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील, माजी ग्रा.पं.सदस्य अनिल महाजन, सुनील पाटील उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून कजगावचा पाणी प्रश्न बिकट झालेला होता. जि.प.चे माजी सदस्य मंगेश पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे अंदाजे दोन कोटी रुपयांची योजना मंजूर झाली आहे. योजनेचे काम युध्द पातळीवर पूर्ण करून कजगाव चा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी प्रथम प्राधान्य देत आहे.
- वैशाली पाटील, सरपंच