एम.ए.प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 18:59 IST2020-11-28T18:59:33+5:302020-11-28T18:59:45+5:30
जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ करिता एम.ए. ...

एम.ए.प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरूवात
जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ करिता एम.ए. मराठी, हिंदी व इंग्रजी प्रथम वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला ११ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे.
यावेळी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिाणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर क्वीक लिंकमधील ॲडमिशनमध्ये पीजीवर क्लिक करावी. या ठिकाणी एम.ए.मराठी, हिंदी व इंग्रजी प्रवेशाबाबतचे माहिती पत्रक देण्यात आले आहे. त्याच ठिकाणी ॲप्लिकेश ऑनलाईन लिंक देण्यात आली आहे. कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त विद्यार्थ्यास या अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज सादर करता येणार आहे. प्रशाळेकडून अपलोड केलेली कागदपत्रे प्रशाळेकडून तपासणी झाल्यावर प्रवेश शुल्क ऑनलाईन भरण्यासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. मराठी, हिंदी व इंग्रजी या विषयांसाठीची प्रत्येकी प्रवेश क्षमता ३० एवढी आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी प्रा.मुक्ता महाजन, डॉ.सुनील कुलकर्णी, डॉ. अशुतोष पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे प्रशाळेचे संचालक मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.म.सु.पगारे यांनी कळविले आहे.