सुमधूर भजनांनी महात्मा गांधींना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 13:09 IST2019-10-02T13:07:46+5:302019-10-02T13:09:02+5:30

विद्यापीठ : प्लॅस्टिक मुक्त अभियानाला प्रारंभ

 The beautiful hymns paid homage to Mahatma Gandhi | सुमधूर भजनांनी महात्मा गांधींना आदरांजली

सुमधूर भजनांनी महात्मा गांधींना आदरांजली

जळगाव- महात्मा गांधी जयंती निमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गांधी टेकडीवर सुमधूर भजन सादर करुन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली.
विद्यापीठातील विचारधारा प्रशाळे अंतर्गत असलेल्या महात्मा गांधी अभ्यास आणि संशोधन केंद्राच्यावतीने बुधवारी गांधी टेकडीवर महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त कुलगुरु प्रा. पी.पी.पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत विभाग प्रमुख प्रा.संजय पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भजन सादर केले. यामध्ये किर्ती पंचभाई, भाग्यश्री भंगाळे, जयश्री पाटील, नंदीता बकोरे व प्रा.संजय पत्की यांनी भजन सादर केले़ तबल्यावर तेजस मराठे यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख डॉ. अनिल चिकाटे यांनी केले.

विद्यार्थ्यांनी काढली प्लॅस्टिक मुक्त रॅली
समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात हाती घेतलेल्या प्लॅस्टीक मुक्त परिसर अभियानाला कुलगुरुंच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. याशिवाय केंद्रीय विद्यालय आणि विद्यापीठातील रासेयो एकक यांच्या संयुक्त विद्यमाने प्लॅस्टीक मुक्त अभियान रॅली काढण्यात आली. विद्यापीठातील या विविध कार्यक्रमास प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, कुलसचिव भ.भा.पाटील, संचालक बी.पी.पाटील, अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी, प्र.वित्तव लेखा अधिकारी एस.आर.गोहिल, संचालक डॉ.सत्यजित साळवे, डॉ.पंकजकुमार नन्नवरे, डॉ.अनिल डोंगरे, आर.आय.पाटील, डॉ.सुनील कुलकर्णी, डॉ.पवित्रा पाटील, प्रा.संतोष खिराडे, प्रा.चिंतामण आगे, आदी उपस्थित होते.

 

Web Title:  The beautiful hymns paid homage to Mahatma Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.