जळगावातील शेतक-यांना मिळणार केळी व भाजीपाल्याच्या निर्यातीचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 10:47 PM2018-02-15T22:47:28+5:302018-02-15T22:54:34+5:30

डायरेक्टर फॉरेन ट्रेडचे अधिकारी करणार शेतकºयांना २१ रोजी मार्गदर्शन

Banana and Vegetable Export Training for Jalgaon farmers | जळगावातील शेतक-यांना मिळणार केळी व भाजीपाल्याच्या निर्यातीचे प्रशिक्षण

जळगावातील शेतक-यांना मिळणार केळी व भाजीपाल्याच्या निर्यातीचे प्रशिक्षण

Next
ठळक मुद्देगारपीट व बोंडअळीच्या पंचनाम्यांचा घेतला विभागीय कृषी संचालकांनी आढावा२५० शेतक-यांना मिळणार फळे व भाजीपाल्यांच्या निर्यातीचे प्रशिक्षणडायरेक्टर फॉरेन ट्रेडचे अधिकारी करणार जळगावातील शेतक-यांना मार्गदर्शन

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१५: जळगाव जिल्ह्यात उत्पादीत होणा-या केळी, हिरवी मिरची, ढोबळी मिरची व भेंडी यांची विदेशात निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची माहिती देण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे २१ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेचा आढावा विभागीय कृषी संचालक डॉ.दिलीप झेंडे यांनी गुरुवारी घेतला.
नाशिकच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यात उत्पादीत होणा-या केळी, हिरवी मिरची, ढोबळी मिरची व भेंडीची विदेशात निर्यात होण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. विभागीय कृषी संचालक डॉ.दिलीप झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, अ‍ॅग्रो व्हिजनचे डॉ.संतोष डुकरे, डॉ.अनिल भोकरे यांची उपस्थिती होती. डॉ. झेंडे यांनी कार्यशाळेच्या नियोजनाचा आढावा घेतला. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील २५० शेतक-यांना बोलविण्यात येणार ाआहे. त्यांना डायरेक्टर फॉरेन ट्रेडचे जॉर्इंट कमिशनर डॉ.एस.के.बन्सल, डेप्युटी जॉर्इंट कमिशनर संभाजी चव्हाण, डेप्युटी जॉर्इंट कमिशनर (जीएसटी अ‍ॅण्ड एक्सपोर्ट) के.एम.हरिलाल हे मार्गदर्शन करणार आहेत.
त्यानंतर डॉ.दिलीप झेंडे यांनी ममुराबाद येथील केंद्रावर जिल्ह्यातील कृषी अधिका-यांची आढावा बैठक घेतली. त्यात नुकतीच झालेली गारपीट, बोंडअळीमुळे झालेले नुकसान यांचा आढावा त्यांनी घेतला.

Web Title: Banana and Vegetable Export Training for Jalgaon farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव